पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांचं यश, ऑनलाईन फसवणुकीत गमावलेले 24 कोटी केले परत, काय घडलं?
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Cyber Police: फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्वरित 1930 या सायबर हेल्पलाईनवर संपर्क करा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पुणे: गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत. सायबर पोलिसांनी दाखल झालेल्या गुन्ह्यांचा सखोल तपास करून पीडितांना कोट्यवधी रुपये परत मिळवून दिले आहेत. पोलिसांनी गेल्या वर्षभरात केलेल्या या कारवाईमुळे चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत आणि अशा घटनांना रोखण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे.
सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत 2024 साली स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याला मंजुरी देण्यात आली. आयुक्तालयांतर्गत सध्या 25 पोलीस ठाणे कार्यरत आहेत. या पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीच्या घटनांची तक्रार केली जाते आणि या ठिकाणाहूनच गुन्ह्याचा छडा लावला जातो. गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटनांचा तपास पोलिसांनी केला आहे.
advertisement
112 गुन्हे उघडकीस, 215 संशयितांना अटक
गेल्या वर्षभरात सायबर फसवणुकीसारख्या गुन्ह्यांवर पोलिसांनी ठोस कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 112 गुन्हे उघडकीस आले, तर 215 संशयितांना अटक करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईतून पीडितांना एकूण 24 कोटी 38 लाख 52 हजार 842 रुपये परत मिळवून दिले आहेत. यामुळे सायबर गुन्ह्यांचे शिकार झालेले नागरिक मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
advertisement
फसवणूक झाल्यास काय करावे?
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्वरित 1930 या सायबर हेल्पलाईनवर संपर्क करा किंवा www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर आपली तक्रार नोंदवा. तसेच, जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार देणेही आवश्यक आहे.
नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये?
view commentsप्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे तरीसुद्धा या फसवणुकीमध्ये शिक्षित लोकांचे प्रमाण लक्षणीय आहे. कोणत्याही अधिकच्या परताव्याच्या भुलथापांना बळी न पडण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. अलीकडेच पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. जवळपास 12 हजार नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता.
Location :
Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 12:23 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांचं यश, ऑनलाईन फसवणुकीत गमावलेले 24 कोटी केले परत, काय घडलं?










