मंत्र जप, देवाचं नामस्मरण आणि सतत हनुमान चालीसा पठण, प्रेग्नन्सीनंतर परिणीती चोप्रासोबत असं काय घडत होतं?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Parineeti Chopra : परिणीती चोप्राने ऑक्टोबर 2025 मध्ये एका मुलाला जन्म दिला आहे. पण आई होताच परिणीतीला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दोन महिन्यांपूर्वी मुलगा नीरची आई झालेल्या परिणीतीने आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने मन शांत ठेवण्याचे आणि स्वतःला रिलॅक्स ठेवण्याचे मार्ग सांगितले आहेत. परिणीतीच्या मते, दिवसाची सुरुवात योग्य पद्धतीने करणे खूप महत्त्वाचे आहे. तिने सांगितले की सकाळी उठताच मोबाईल फोन वापरणे टाळावे, कारण त्यामुळे मेंदूवर ताण येतो.
advertisement
परिणीती म्हणाली,"जर तुमचे मन सकारात्मक असेल, तर शरीरही तसाच प्रतिसाद देते. आजकाल बहुतांश लोक डोळे उघडताच फोन हातात घेऊन स्क्रोलिंग सुरू करतात, ही सगळ्यात वाईट सवय आहे. यामुळे मेंदू सुन्न होतो आणि संपूर्ण दिवसावर त्याचा वाईट परिणाम होतो.” पुढे ती सांगते की ती सकाळी फोनपासून दूर राहून स्वतःसाठी वेळ काढते.
advertisement
परिणीती पुढे म्हणते, “जर तुम्ही सकाळी उठून फोनकडे दुर्लक्ष केले, थोडा वेळ शांत बसलात, संगीत ऐकले, निसर्गाच्या जवळ गेलात, पक्ष्यांचे आवाज ऐकले, तर मन आपोआप शांत होते. मी सकाळी उठताच मंत्रजप करते. कधी हनुमान चालीसा, तर कधी ‘नमामि शमीशम’चा पाठ करते. माझा दिवस याच सकारात्मक ऊर्जेसोबत सुरू व्हावा, अशी माझी इच्छा असते.”









