आता हद्दच झाली! थेट पोलिसाकडेच मागितली 15 लाखांची खंडणी, कारण धक्कादायक, सोलापूरची घटना

Last Updated:

Solapur News: सापळा लावलेल्या पथकाला इशारा दिल्यानंतर पोलिसांनी हॉटेलमध्ये आरोपींना दिलेली रक्कम व दोन चेकसह ताब्यात घेतले.

आता हद्दच झाली! थेट पोलिसाकडेच मागितली 15 लाखांची खंडणी, कारण धक्कादायक, सोलापूरची घटना
आता हद्दच झाली! थेट पोलिसाकडेच मागितली 15 लाखांची खंडणी, कारण धक्कादायक, सोलापूरची घटना
सोलापूर: पोलिसांनी पैशाची मागणी केलेले व्हिडिओ, लाचेचे मागणी केलेले गुन्हे दाखल झालेले आपण आजपर्यंत पाहिले असाल. पण सोलापूर शहरात पोलिसावर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी चक्क 15 लाखांची खंडणी स्वीकारताना तिघांना रंगेहात पकडण्यात आलंय. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र रामहरी भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, भोसले यांच्यावर एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपींनी 15 लाख रुपयांची मागणी केली होती. ती रक्कम घेऊन एम्प्लॉयमेंट चौकातील हॉटेलमध्ये बोलावले असल्याची तक्रार भोसले यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्या हॉटेलमध्ये सापळा लावला.
advertisement
हॉटेलमध्ये पूजा ढवळे, मिलिंद कांबळे व लक्ष्मी लोंढे हे तिघे फिर्यादींना भेटले आणि गुन्हा मागे घेण्याकरिता 50 हजार रुपये रोख रक्कम, दि कराड अर्बन को-ऑप लि. शेड्युल बँकचा 1 लाख 50 हजार रुपयांचा चेक आणि 13 लाख रुपयांचा चेक असे दोन चेक जितेंद्र भोसले यांनी मिलिंद कांबळे व लक्ष्मी लोंढे यांच्याकडे दिले. तेव्हा बाहेर सापळा लावलेल्या पथकाला इशारा दिल्यानंतर पोलिसांनी हॉटेलमध्ये आरोपींना दिलेली रक्कम व दोन चेकसह ताब्यात घेतले.
advertisement
याप्रकरणी जितेंद्र रामहरी भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पूजा ढवळे (वय 37, शिवगंगा नगर), मिलिंद कांबळे (वय 47, बुधवार पेठ) आणि लक्ष्मी लोंढे (वय 45, एस.आर.पी.एफ. कॅम्प) या तिघांवर भारतीय न्यायसंहिता 308(2), 351(2), 3(5) प्रमाणे जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
आता हद्दच झाली! थेट पोलिसाकडेच मागितली 15 लाखांची खंडणी, कारण धक्कादायक, सोलापूरची घटना
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement