advertisement

Nashik News: श्रीराम रथोत्सव- गरूड रथोत्सवामुळे नाशिकच्या वाहतुकीत बदल, कोणते असणार पर्यायी मार्ग

Last Updated:

नाशिक शहरामध्ये उद्या श्रीराम आणि गरूड रथोत्सव मिरवणूक पार पडणार आहे. या रथोत्सवामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहे.

News18
News18
नाशिक: राम नवमी आणि हनुमान जयंतीच्या निमित्ताने नाशिकमध्ये श्रीराम आणि गरूड रथोत्सव मिरवणूक पार पडणार आहे. यामुळे नाशिक शहरातील महत्त्वाच्या भागातील वाहतुकीमध्ये बदल केला जाणार आहे. शहरातील महत्त्वाच्या भागामध्ये, दुपारी 2 वाजेपासून वाहतूकीमध्ये बदल होणार असून ते रात्री मिरवणूक संपेपर्यंत प्रमुख मार्गांवर वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलि‍सांनी घेतला आहे. नाशिक शहरातील कोणकोणत्या परिसरातील वाहतूकीमध्ये बदल होणार आहे, जाणून घेऊया...
रविवारी 29 मार्च 2026 रोजी नाशिक शहरामध्ये, श्रीराम रथ आणि श्री गरूड रथची मिरवणूक निघणार आहे. शहरातील महत्त्वाच्या परिसरातून ही मिरवणूक मार्गस्थ होणार आहे. काळाराम मंदिर परिसर, नागचौक, लक्ष्मण झुला पूल, गणेशवाडी, महात्मा फुले चौक, आयुर्वेदिक हॉस्पिटल, मरीमाता रोड, रामकुंड, सराफ बाजारसह इतरत्र मार्गांवर वाहतुकीसाठी निर्बंध राहणार आहे. कारण, की या मार्गांवरूनच रथोत्सव निघणार आहे. श्रीराम रथ आणि श्री गरूड रथ हे दोघंही मिरवणूकीसाठी एकत्रच मार्गस्थ होणार आहेत.
advertisement
गरूड रथ जुना आडगाव नाका, दिल्ली दरवाजा, नेहरू चौक, धुमाळ पॉईंट, मेनरोड, बोहोरपट्टी आणि सराफ बाजारमार्गे रामसेतू पुलाच्या पश्चिम बाजूने पुन्हा श्रीराम रथासोबत मुख्य मुरवणुकीत सामील होणार आहे. या मिरवणुकीला दुपारी 2 वाजेपासून सुरूवात होणार आहे. जोपर्यंत मिरवणुक सुरू राहणार आहे, तोपर्यंत रथोत्सवाचा मार्ग बंद राहणार आहे. मिरवणुकीसाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संबंधितची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त किरिथीका सी.एम यांनी दिलेली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: श्रीराम रथोत्सव- गरूड रथोत्सवामुळे नाशिकच्या वाहतुकीत बदल, कोणते असणार पर्यायी मार्ग
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement