Nashik ST Accident: सिन्नर बसस्थानकात एसटी थेट फलाटावर चढली, चिरडून चिमुकल्याचा मृत्यू; Video समोर
- Published by:Prachi Amale
- Reported by:Laxman Ghatol
Last Updated:
बस थेट फलाटावर चढल्यानं भीषण अपघात झाला असून यामध्ये चार ते पाच जखमी असून एका मुलाचा मृत्यू झाला आहे.
नाशिक : नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात भीषण घटना घडली आहे. बस थेट फलाटावर चढल्यानं भीषण अपघात झाला असून यामध्ये चार ते पाच जखमी असून एका मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. ही एसटी बस सिन्नर येथून देवपूरला जाणार होती.
समोर आलेल्या माहितीनुसार, सिन्नर बस टर्मिनल परिसरात सकाळी साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा भीषण अपघात झाला. नादुरुस्त असलेली एसटी बस सिन्नर देवपूर जाणार होती. फलाट क्रमांक सहावर ही बस लावण्यासाठी येत असताना गाडीचे ब्रेक फेल झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर ही बस थेट फलटावर चढून चार-पाच जणांना उडवून पुन्हा माघारी येऊनच थांबली. या अपघातात एकूण तीन जखमी असून नऊ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. आदर्श बोराडे असे या चिमुकल्याचे नाव अशून दापूर तालुका सिन्नर येथील बालकाला आपले प्राण गमवावे लागले.
advertisement
या घटनेनंतर सिन्नर पोलीस, रुग्णवाहिका, उदय सांगळे, प्रमोद चोथवे, सिन्नरचे तहसीलदार, नायब तहसीलदार हे घटनास्थळी दाखल झाले. जखमींना खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. तेथेही प्रमोद चोथवे आणि नामदेव लोंढे यांनी जखमींची विचारपूस करून गंभीर जखमी असलेल्या बालकाला नाशिक येथे हलवले. मात्र नाशिकपर्यंत आदर्श बोराडे या 9 वर्षाच्या चिमुकल्याने आपले प्राण सोडले होते.
advertisement
प्रवासी संतापले
या सर्व घटनेनंतर उदय सांगळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाला जाब विचारात घटनेची चौकशी सुरू केली. यासोबतच या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा त्यांना मिळवले. यातून या घटनेची भीषणता स्पष्ट झाली. आणि यातूनच अनेक प्रश्न निर्माण झाले. सोबतच ही बस नादुरुस्त असल्याचे ही पुढे आले. घटनेनंतर महामंडळाने जी तत्परता दाखवायला हवी होती, ती न दाखवता, सर्वच प्रशासन ढिम्म अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला.
advertisement
पाहा Video :
चिमुकल्याच्या घरच्यांचा आक्रोश
संतप्त झालेल्या या बालकाच्या नातेवाईकांनी उदय सांगळे यांच्या साथीने पोलीस प्रशासन आणि एसटी महामंडळाला न्याय देण्याची मागणी करत आपला आक्रोश केला. या बालकाच्या मृतदेहासह सिन्नर बस टर्मिनल बाहेर नाशिक पुणे हायवेवर रास्ता रोको करण्यात आला. पण सिन्नर पोलिसांनी अवघ्या 1 मिनिटात विनंती करून एकेरी वाहतूक सुरु केली. तसेच रुग्णवाहिकांना जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देण्यात आला. सिन्नर पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्या मध्यस्थीने अवघ्या दोन मिनिटात महामंडळ आणि संतप्त जमावाची चर्चा घडवून देण्यात आली.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
November 19, 2025 5:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik ST Accident: सिन्नर बसस्थानकात एसटी थेट फलाटावर चढली, चिरडून चिमुकल्याचा मृत्यू; Video समोर


