Vani News : सप्तशृंगगडावर पोहोचणे होणार सोपे, पर्यायी रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार, कसा असेल मार्ग?
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Need for an Alternate Road to Saptashringgad : सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आता लवकरच रडतोंडी पर्यायी घाट रस्त्याने सुरक्षित आणि सोपा प्रवास करता येणार. या महत्त्वाकांक्षी कामाचे अंदाजपत्रक तयार झाले असून यामुळे गडावरील प्रवासातील धोका कमी होईल आणि भाविकांना मोठा दिलासा मिळेल
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगगडावर जाणाऱ्या भाविकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सध्या नांदुरी ते सप्तश्रृंगगड या एकमेव घाटरस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी आणि पावसात दरड कोसळण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी आता रडतोंडी मार्गे नव्या पर्यायी रस्त्याच्या सर्वेक्षणाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला आहे.
पर्यायी रस्त्याची गरज का?
सध्याचा नांदुरी घाट रस्ता चैत्रोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या वेळी पूर्णपणे जाम होतो, ज्यामुळे भाविकांचे मोठे हाल होतात. याशिवाय पावसाळ्यात दरड कोसळल्याने अनेकदा हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागतो. या अडचणी लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पर्यायी मार्गाच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले होते.
सर्वेक्षणासाठी सादर झालेला प्रस्ताव
सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) पारंपरिक रडतोंडी घाट रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी एकूण 1 कोटी 55 लाख 37 हजार 233 चा सविस्तर प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला आहे.
advertisement
कामाचा तपशील अंदाजित खर्च
1)सर्वेक्षण कार्य : 28 लाख 34 हजार 362
2)जमीन संपादनाचे काम : 81 लाख 86 हजार 951
3)भूतांत्रिक, माती सर्वेक्षण काम : 5 लाख 63 हजार 559
4)डिझाइन, अंदाज, रेखाचित्र काम : 14 लाख 71 हजार 526
5)जीएसटीसाठी : 23 लाख 50 हजार 169
6)कामगार विमा : 1 लाख 30 हजार 565
advertisement
7)एकूण : 1 कोटी 55 लाख 37,233
निधीबद्दल संभ्रमावस्था
view commentsसप्तश्रृंगगडासाठी पर्यायी मार्गाची नितांत आवश्यकता असली तरी, सर्वेक्षणासह पूर्ण प्रकल्पाचा खर्च मोठा असणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी आवश्यक निधीची व्यवस्था कोणत्या खात्यातून करायची, याबाबत बांधकाम विभाग आणि जिल्हा नियोजन मंडळ यांच्यात अजून संभ्रमावस्था आहे. सिंहस्थ निधीतून काही आर्थिक मदत मिळू शकते का, याची चाचपणी सध्या प्रशासकीय स्तरावर केली जात आहे. हा पर्यायी रस्ता पूर्ण झाल्यास, सप्तश्रृंगगडावर येणाऱ्या भाविकांचा प्रवास निश्चितच सुकर होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 11, 2025 12:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Vani News : सप्तशृंगगडावर पोहोचणे होणार सोपे, पर्यायी रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार, कसा असेल मार्ग?


