advertisement

Nashik News: 55 फूट उंच अन् 50 फूट रुंद आंबेडकर जयंतीनिमित्त उभारली 'लंडन स्कुल ॲाफ इकॉनॉमिक्स'ची प्रतिकृती!

Last Updated:

नाशिकच्या शालिमार चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या येत्या जयंतीनिमित्त 'लंडन स्कुल ॲाफ इकॉनॉमिक्स' वास्तुची भव्य दिव्य प्रतिकृती साकारली जाणार आहे.

News18
News18
नाशिक: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती येत्या 14 एप्रिल रोजी संपूर्ण जगभरात साजरी केली जाणार आहे. महामानवाच्या जयंतीनिमित्त देशासह संपूर्ण महाराष्ट्रात अनेक वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिकृती सुद्धा साकारल्या जातात. नाशिकच्या शालिमार चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या येत्या जयंतीनिमित्त परदेशातल्या एका ऐतिहासिक वास्तुची भव्य दिव्य प्रतिकृती साकारली जाणार आहे. या भव्य दिव्य प्रतिकृतीसाठी आतापासूनच कामाला सुरूवात झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये कसली प्रतिकृती साकारली जाणार आहे, जाणून घेऊया...
नाशिकच्या शालीमार चौकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून 'लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स'ची भव्य दिव्य प्रतिकृती साकारली जाणार आहे. यंदाच्या 135 व्या जयंतीनिमित्त नाशिककरांसाठी भव्य दिव्य आणि डोळे दिपवून टाकणारा सेट उभारला जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्या अनुषंगाने आता 'लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स'चा सेट उभारण्यासाठी सुरूवात झालेली आहे. 55 फूट उंच, 50 रूंदी उंचीची प्रतिकृती साकरण्यासाठी शालिमार चौकामध्ये, 15 दिवस आधीपासूनच 25 कारागिर हा डोळेदिपवून टाकणारा सेट उभारण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत आहेत.
advertisement
या ऐतिहासिक वास्तूची हुबेहूब प्रतिकृती साकारली जात आहे. ज्या संस्थेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थशास्रातील सर्वोच्च पदवी मिळवली, त्या 'लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स' विद्यापीठाची हुबेहुब प्रतिकृती साकारली जात आहे. खरंतर, हा फक्त देखावा नसून नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक कतृत्वाची आणि आर्थिक विचारांची जाणीव करून देणारा देखावा असणार आहे. "बाबासाहेबांनी आपल्या शिक्षणाच्या जोरावर जगभरात भारताचा ठसा उमटवला. त्यांचे हेच विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचावे, यासाठी आम्ही हा देखावा साकारत आहे", अशी प्रतिक्रिया शालिमार चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: 55 फूट उंच अन् 50 फूट रुंद आंबेडकर जयंतीनिमित्त उभारली 'लंडन स्कुल ॲाफ इकॉनॉमिक्स'ची प्रतिकृती!
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement