गोदावरीच्या किनारी आंब्याच्या बागेत मिसळ खाण्याचा अनुभव घ्यायचाय? मग या ठिकाणाला नक्की द्या भेट
- Published by:Devika Shinde
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
कोरोना नंतर एका शेतकरी कुटुंबाने आपल्या शेतात दुहेरी धंधा म्हणून आपल्या शेतात केली मिसळ विक्रीची सुरवात.
कुणाल दंडगव्हाळ- प्रतिनिधी, नाशिक : कोरोना नंतरच्या काळात, एक शेतकरी कुटुंबाने आपल्या शेतात दुहेरी धंदा म्हणून मिसळ विक्री सुरू केली आहे. निर्मल काटे, एक तरुण बी.कॉम आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट मॅनेजमेंटचा अभ्यास करणारा, नाशिकमध्ये स्वतःचा एक अनोखा व्यवसाय चालवत आहे.
निर्मलने लोकल 18 सोबत बोलताना सांगितले की, शिक्षण घेत असतानाच त्याला व्यवसाय सुरू करण्याची कल्पना होती. वडिलांपासून शेतकरी असल्यामुळे, त्याने शेतीसोबत काहीतरी व्यवसाय करायचा निर्णय घेतला. "२०२२ मध्ये मिसळची सुरुवात केली, पण व्यवसायात अनेक अडचणी आल्या. स्पर्धा वाढत गेली आणि अनेक वेळा विचार आला की हा व्यवसाय चालवावा की नाही," असे निर्मलने सांगितले. परंतु, त्याने 2024 मध्ये आपले स्वप्न पूर्ण केले.
advertisement
निर्मलच्या वडिलांनी शेतात आंब्याची झाडे लावली होती, ज्यामुळे त्याच्या व्यवसायाला फायदा झाला. "गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर बसून, आंब्याच्या झाडांखाली आम्ही मिसळ विकतो. या रमणीय ठिकाणी 100 रुपयात मिसळ मिळते," असे तो पुढे सांगतो.
मिसळ खाण्यासाठी लांबून लोक येत आहेत आणि आमच्या कडे येणाऱ्या ग्राहकांना आनंद मिळतो, असं देखील निर्मल म्हणाला. शिक्षण चांगले झाले आहे पण तरीही तो या व्यवसायात उतरला, ज्यातून त्याला लाखाचा वर उत्पन्न मिळत आहे. "आमच्याकडे 8 ते 10 लोक काम करत आहेत, त्यामुळे त्यांना रोजगार मिळतोय आणि वडिलांना देखील आनंद आहे," असे निर्मलने सांगितले.
advertisement
जर तुम्हाला या आंब्याच्या बागेत आणि गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर बसून मिसळ खाण्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर गंगापूर रोडवरील आनंद वल्ली गावापासून 1 किलोमीटर अंतरावर "मँगो विले" येथे या खास मिसळचा आस्वाद घेऊ शकता!
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
October 21, 2024 8:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
गोदावरीच्या किनारी आंब्याच्या बागेत मिसळ खाण्याचा अनुभव घ्यायचाय? मग या ठिकाणाला नक्की द्या भेट

