Nashik News: त्र्यंबकेश्वर मुलं विक्री प्रकरणात ट्विस्ट, धक्कादायक कागदपत्रे न्यूज 18 लोकमतच्या हाती
- Reported by:Laxman Ghatol
- Published by:Prachi Amale
Last Updated:
केवळ 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सिनेस्टाईल कथा लिहित मुलीला दत्तक दिल्याचा स्टॅम्प पेपरवर उल्लेख केलं आहे.
नाशिक : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मुल विक्री प्रकरणात धक्कादायक कागदपत्रे न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत. बच्चीबाई हांडोगे या महिलेने स्वतःच्या गावात विकलेल्या मुलीच बेकायदेशीर दत्तक पत्र बनवल्याचं समोर आले आहे. केवळ 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सिनेस्टाईल कथा लिहित मुलीला दत्तक दिल्याचा स्टॅम्प पेपरवर उल्लेख केलं आहे.
मुलीला दत्तक देत असल्याचं बेकायदेशीर डॉक्युमेंट 16 डिसेंबर 2019 रोजी बनवल गेलं आहे. बच्चीबाई हांडोगे या महिलेने 12 पैकी 3 ते 4 मुलांची विक्री केल्याचा संशय व्यक्त होत असताना धक्कादायक डॉक्युमेंट समोर आलं आहे. गावातीलच राजू बांगारे आणि सावित्री बांगारे यांनी केवळ 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर गावातील काही साक्षीदारांच्या सह्यांच्या आधारावर लक्ष्मी नावाच्या मुलीला दत्तक घेत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
advertisement
बेकायदेशीर दस्त लागले हाती
मुलं विक्री करणाऱ्या बच्चीबाई हाडोंगे या महिलेचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेकायदेशीर स्टॅम्प पेपरवर लिहून घेण्यात आलेल्या दत्तक पत्राच्या आधारावर लक्ष्मी नावाच्या मुलीचे आई वडील शाळेच्या नोंदीत बदलण्यात आल्या आहेत. न्यूज 18 लोकमतच्या हाती बच्चीबाई हांडोगे आणि राजू बांगारे यांच्यातील मूल देवाण घेवाण केल्याचं बेकायदेशीर दस्त लागले आहे.
advertisement
नेमकं कसं बिंग फुटलं?
बच्चूबाई हंडोगेनं 10 ऑक्टोबर 2025 रोजी अपत्याला जन्म दिला होता. मात्र बाळाचं वजन कमी होतं. त्यामुळे आरोग्य विभागानं अपत्याच्या तपासणीसाठी आशा कर्मचाऱ्याला त्या महिलेच्या घरी पाठवलं. त्यावेळी बच्चूबाईनं अपत्याला विकल्याचं आशा कर्मचाऱ्याला सांगितलं. त्यानंतर तिचं बिंग फुटलं. आशा कर्मचारी गावागावातील महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. आशा कर्मचाऱ्यांचं काम अतिशय खडतर आहे. तरीही त्या कर्तव्यात कसूर करत नाही. त्यातून प्रेरणा घेऊन आशा हा सिनेमा तयार करण्यात आलाय. त्या सिनेमात अभिनेत्री रिंकू राजगुरूनं आशा कर्मचाऱ्याची भूमिका साकारलीय.
advertisement
आशा कर्मचाऱ्याची भूमिका केलेल्या रिंकू राजगुरूनं बच्चूबाई हंडोगे प्रकरणी काय मत व्यक्त केलं. हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच मुल विक्रीची धक्कादायक बातमी समोर आली. सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली. मुल विक्री प्रकरणात मोठं रॅकेट आहे का, आणि त्या रॅकेटच्या संपर्कात बच्चूबाई हंडोगे सारख्या किती महिला आहेत? याचा तपास झाला तर किती मुलं आतापर्यंत विकण्यात आली, हे सत्य उघड होईल.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Dec 10, 2025 9:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: त्र्यंबकेश्वर मुलं विक्री प्रकरणात ट्विस्ट, धक्कादायक कागदपत्रे न्यूज 18 लोकमतच्या हाती








