Working Hours: 12 तासाच्या कामाचा निर्णय घेण्याचं कारण काय होतं? खरंच हे शक्य झालं असतं का?

Last Updated:

Working Hours: यशवंत भोसले यांनी कामाचे तास वाढवण्याच्या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला होता.

+
Working

Working Hours: 12 तासाच्या कामाचा निर्णय घेण्याचं कारण काय होतं? खरंच हे शक्य झालं असतं का?

पुणे: राज्य सरकारने कारखान्यातील कामगारांच्या एका दिवसाच्या कामाची वेळ 9 तासांवरून तब्बल 12 तास करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला कामगार संघटनांकडून तीव्र विरोध झाला. विरोधकांनी देखील या निर्णयावर सडकून टीका केली. विरोध होत असल्याचं बघून अखेर सरकारने हा निर्णय मागे घेतल्याची घोषणा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केली. कामगार संघटनांच्या सूचनांचा विचार करून नवे धोरण तयार केलं जाईल, असं त्यांनी स्पष्ट केले. सरकारला हा निर्णय का मागे घ्यावा लागला? निर्णय जाहीर करण्याच्या आधीच कामगारांचं मत विचारात का घेण्यात आलं नाही ? याविषयी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भाऊ भोसले यांनी लोकल18ला माहिती दिली.
राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भाऊ भोसले यांनी, कामाचे तास वाढवण्याच्या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला होता. सरकारने कामगार संघटनांशी चर्चा न करता थेट निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी सरकारचे कान टोचले. असा महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी कामगार संघटनांशी चर्चा होणे गरजेचं होतं, असे भोसले यांनी सांगितलं.
advertisement
12 तासांची शिफ्ट अंमलात आणणे शक्य नाही
12 तासांची शिफ्ट प्रत्यक्षात अंमलात आणणे शक्य नाही, असं मत भोसले यांनी व्यक्त केलं. कामगारांना 12 तास काम करायला लावल्यास त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतील आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात घटतील, असंही ते म्हणाले. पुढील काळात कोणताही निर्णय घेताना सरकारने कामगार संघटनांशी चर्चा करूनच पावले उचलावीत, असा सल्ला यशवंत भोसले यांनी दिला आहे.
advertisement
कामगारांच्या नियमांमध्ये बदल करण्यापूर्वी विशेष एसओपी तयार करून ती कामगार संघटनांकडे अभ्यासासाठी देण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आलं आहे. यात कामगारांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच सामाजिक सुरक्षा, आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक अडचणींचा सर्वांगीण विचार करूनच सकारात्मक आणि हितकारक बदल केले जातील, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Working Hours: 12 तासाच्या कामाचा निर्णय घेण्याचं कारण काय होतं? खरंच हे शक्य झालं असतं का?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement