Navi Mumbai : गणेश नाईकच नवी मुंबईचे किंग, शिंदेंच्या शिवसेनेचा टांगा पलटी! भाजपची जोरदार मुसंडी
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
नवी मुंबईमध्ये गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा त्यांचं निर्विवाद वर्चस्व दाखवून दिलं आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा त्यांचं निर्विवाद वर्चस्व दाखवून दिलं आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. नवी मुंबईतल्या 111 जागांपैकी 75 जागांवर भाजप, 32 जागांवर शिवसेना आणि फक्त एका जागेवर शिवसेना उद्धव ठाकरे यांचा उमेदवार आघाडीवर आहे.
नवी मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढली. या निवडणुकीत गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातला संघर्ष महाराष्ट्राने पाहिला. मागच्या वर्षभरापासून गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं. भाजपनं परवानगी दिल्यास एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी घोडे फरार करणार, अशी प्रतिक्रिया वनमंत्री गणेश नाईक यांनी न्यूज 18 मराठीसोबत बोलताना दिली होती, त्यामुळे राजकारण तापलं होतं. शिंदेंनी माझ्या नादी लागू नये, हलक्यात घेऊ नका... शिंदेंनी स्वत:च्या गळ्याला फास लावून घेतला आहे. स्वत:च्या हिमतीवर निवडणूक लढवून दाखवा, असं आव्हानही गणेश नाईक यांनी शिंदेना दिलं होतं.
advertisement
याआधी गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीचं निर्विवाद वर्चस्व होतं. मागच्या महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 52 जागांवर तर शिवसेना 38, काँग्रेस 10, भाजप 6 आणि अपक्ष 6 उमेदवार जिंकले होते.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 4:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navi Mumbai : गणेश नाईकच नवी मुंबईचे किंग, शिंदेंच्या शिवसेनेचा टांगा पलटी! भाजपची जोरदार मुसंडी








