Nawab Malik: एबी फॉर्म देण्याबाबत एवढा सस्पेन्स का? नवाब मलिक यांनी थेटच सांगितलं

Last Updated:

Nawab Malik: विरोध करणाऱ्यांना शुभेच्छा, उमेदवारीला विरोध करणाऱ्यांना नवाब मलिक यांनी डिवचलं

अजित पवार-नवाब मलिक-देवेंद्र फडणवीस
अजित पवार-नवाब मलिक-देवेंद्र फडणवीस
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून उमदेवारी अर्ज दाखल केला आहे. अगदी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीनं त्यांना एबी फॉर्म देऊन अखेर सस्पेन्स मिटवला आहे. मलिकांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना अखेरच्या क्षणी एबी फॉर्म मिळाला असून आता पक्षाचं अधिकृत उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. पण त्यांच्या उमेदवारीला भाजपनं विरोध केलाय. मलिकांचा प्रचार करणार नसल्याचं भाजपनं स्पष्ट केलंय
वेळ संपण्यापूर्वी नवाब मलिक यांना अजित दादांनी शेवटच्या क्षणी आपल्या पक्षाकडून एबी फॉर्म दिला. नवाब मलिक यांच्या नावाला आधीच फडणवीस आणि भाजपकडून विरोध होता. असं असतानाही अजित पवार यांनी फॉर्म दिला आहे. आता यावरुन महायुतीमध्ये धुसफूस पाहायला मिळू शकते.
नवाब मलिक यांनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे.
एवढा सन्पेन्स नेमका कशासाठी?
मी या मनाखुर्द शिवाजीनगर भागातून निवडणूक लढवणार ही मी भूमिका स्पष्ट केली होती. दादांनी मला शेवटच्या क्षणी अर्ज दिला आणि उमेदवारी अर्ज दाखल केला. नाहीतर मी अपक्ष म्हणून उभं राहिलंच असतो. कोण माझा विरोध करतो याच्याशी माझं काहीही देणं घेणं नाही. मी 100 टक्के या निवडणुकीत निवडून येणार. भाजप आणि सेनाचा विरोध असेल तर करावा विरोध, मी काय या विरोधाला घाबरत नाही. त्यांचा विरोध असेल तरी मी निवडणूक लढवणार आणि माझी आणि मुलीची जागा मी निवडून आणणार.
advertisement
बळी दिला जातोय असं वाटतं का?
शिंदे गटाकडून दोन्ही ठिकाणी उमेदवार देण्यात आले आहेत. कोण विरोध करतो हा विषय माझ्यासाठी गौण आहे. आम्ही जी कामं केलीय त्या कामाच्या जोरावर आम्ही पुन्हा निवडून येणार. झुंडशाही संपवायची आहे, जनतेचा आग्रह होता, जनतेच्या ताकदीवर मी निवडणूक लढतोय, कोणता पक्ष विरोध करतो त्याला मी घाबरत नाही.
advertisement
शरद पवारांशी संपर्क?
पवार कुटुंबासोबत माझे संबंध बिघडले नाहीत. संकटाच्या काळात दादांनी मला मोठा आधार दिला. मी तुरुंगात असताना दादांनी माझ्या मुलीला मोठा आधार दिला. मी तर दादांचे आभार मानतो, इतका विरोध असतानाही मला उमेदवारी दिली आहे. मला विरोध करणाऱ्यांना शुभेच्छा, मी जनतेच्या बळावर निवडणूक जिंकेन.
माझा कुणी बळी घेऊ शकत नाही. या जनतेनी आग्रह केल्यामुळे मी निवडणूक लढतोय. संजय पाटलाला आघाडी होती, मी निवडणूक येणार हे निश्चित. कितीही विरोध केला तरी मी निवडून येणार. दादांनी मला सांगितलं होतं की आपल्याला इथे निवडणूक लढवायची आहे, एबी फॉर्म शेवटच्या क्षणी पाठवून दिला.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nawab Malik: एबी फॉर्म देण्याबाबत एवढा सस्पेन्स का? नवाब मलिक यांनी थेटच सांगितलं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement