Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री शिंदेंनी माझं तिकीट कापलं, भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
- Published by:Suraj
Last Updated:
Chhagan Bhujbal On Eknath Shinde : भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला सांगितलं होतं त्यामुळे तयारी केली होती पण एकनाथ शिंदे यांनी माझं तिकिट कापलं असा खळबळजनक खुलासा भुजबळ यांनी केलाय.
प्रिती सोमपुरा, नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. लोकसभा निवडणुकीसाठी छगन भुजबळ हे नाशिकमधून इच्छुक होते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला सांगितलं होतं त्यामुळे तयारी केली होती पण एकनाथ शिंदे यांनी माझं तिकिट कापलं असा खळबळजनक खुलासा भुजबळ यांनी केलाय. न्यूज १८ लोकमतला दिलेल्या मुलाखतीत छगन भुजबळ यांनी हा खुलासा केला. तसंच शरद पवार यांच्या निवृत्तीच्या संकेतावरही त्यांनी प्रतिक्रिया दिलीय. शरद पवार हे घरात बसणाऱ्या लोकांपैकी नाहीत असं भुजबळ म्हणाले.
लोकसभेला नाशिक मतदारसंघात लढण्यासाठी छगन भुजबळ इच्छुक होते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग्रह कायम ठेवल्यानं ही जागा शिवसेनेकडे गेली. याबद्दल आता छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलंय. ते म्हणाले की, मला नाशिकमधून निवडणूक लढवायला भाजप नेत्यांनी सांगितलं होतं, त्यामुळे मी तयारीसुद्धा केली होती. लोकसभा निवडणुकीवेळी दोन तीन याद्या जारी झाल्या. तरी माझं नाव आलं नाही. जेव्हा मी चौकशी केली तेव्हा या जागेसाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. त्यांचं म्हणणं होतं की, जर शिवसेनेला ही जागा मिळाली तर आजूबाजूच्या चार पाच जागाही ते जिंकतील पण निकाल याच्या उलट लागला. माझं तिकिट एकनाथ शिंदे यांनीच कापलं.
advertisement
घरी बसणाऱ्यांपैकी शरद पवार नाहीत
शरद पवार यांनी एका प्रचारसभेवेळी निवृत्तीचे संकेत दिले होते. याबद्दल छगन भुजबळ यांना विचारलं असता त्यांनी म्हटलं की, शरद पवार यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. मला माहितीय की ते घरी बसणाऱ्या लोकांपैकी नाहीत. ते एकही दिवस शांत बसणार नाहीत. याआधीही ते अनेकदा असं बोलले आहेत पण राजकारणातून निवृत्ती घेतली नाही.
advertisement
पवारांची तीन वेळा भाजपसोबत जाण्यावर चर्चा
शरद पवार यांनी तीनवेळा भाजपसोबत सरकार स्थापन करण्यावर चर्चा केली होती पण प्रत्येकवेळी मागे हटले असा गौप्यस्फोटही भुजबळ यांनी केला. आम्ही जेव्हा शरद पवार यांची साथ सोडली तेव्हा ५४ आमदारांनी भाजपच्या पाठिंब्यावर सह्या केल्या होत्या. त्यात रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील हेसुद्धा होते. मग हे लोक सोबत का आले नाही असा सवालसुद्धा छगन भुजबळ यांनी विचारला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 07, 2024 12:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री शिंदेंनी माझं तिकीट कापलं, भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट