Konkan News : नेत्रावती एक्सप्रेस संगमेश्वरनंतर आता आणखी एका स्थानकात थांबणार, पाहा वेळापत्रक

Last Updated:

Netravati Express News: कोकण मार्गावरील नेत्रावती एक्सप्रेसला संगमेश्वरनंतर आता राजापूर स्थानकातही प्रायोगिक स्वरूपात थांबा देण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे राजापूरकरांना मोठा दिलासा मिळाला असून प्रवाशांच्या सोयीसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

News18
News18
कोकण : कोकणात जाणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कोकण मार्गावर धावणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेसला आता प्रायोगिक स्वरूपात राजापूर स्थानकात थांबा मंजूर करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार,रेल्वेचा हा थांबा 15 ऑगस्टपासून लागू होणार असून यामुळे राजापूरकरांसह कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नेत्रावती एक्स्प्रेसला राजापूर स्थानकात थांबा मिळावा, यासाठी विविध प्रवासी संघटना आणि राजकीय पक्षांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर या प्रयत्नांना यश मिळालं असून एलटीटी-तिरुवनंतपूरम नेत्रावती एक्स्प्रेस आता राजापूर स्थानकात थांबणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे हे नक्की.
राजापूर रोड हे कोकण रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांसाठी हा प्रमुख थांबा आहे. आतापर्यंत नेत्रावती एक्स्प्रेस येथे थांबत नसल्याने प्रवाशांना रत्नागिरी किंवा कणकवली येथे उतरून पुढील प्रवास करावा लागत होता. आता या थांब्यामुळे मुंबई, गोवा आणि केरळकडे प्रवास करणं सोपं होणार असून प्रवाशांचा वेळही वाचणार आहे.
advertisement
राजापूर स्थानकावर गाडी थांबण्याची वेळ
नवीन वेळापत्रकानुसार, नेत्रावती एक्स्प्रेस राजापूर स्थानकात सायंकाळी 7.40 वाजता आगमन होऊन 7.42 वाजता सुटेल, तर परतीच्या प्रवासात सकाळी 7.38 वाजता आगमन होऊन 7.40 वाजता मार्गस्थ होईल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Konkan News : नेत्रावती एक्सप्रेस संगमेश्वरनंतर आता आणखी एका स्थानकात थांबणार, पाहा वेळापत्रक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement