Train Ticket Rules : 10 मिनिटांमध्ये ट्रेन फुल्ल... दलालांना त्रासलेल्या प्रवाशांना दिलासा देणारी बातमी; ऑनलाईन तिकिटाबद्दल नियम काय ?

Last Updated:

New IRCTC Train Ticket Rules : भारतीय रेल्वेने १ ऑक्टोबरपासून ऑनलाईन तिकिट बुकिंग संबंधित एक नवीन नियम लागू केला आहे. रेल्वेने अर्थात आयआरसीटीसीने ऑनलाईन तिकिट बुकिंगबद्दल केलेल्या बदलांचा फायदा आता सर्वसामान्य प्रवाशांना मिळणार आहे.

भारतीय रेल्वे
भारतीय रेल्वे
भारतीय रेल्वेने १ ऑक्टोबरपासून ऑनलाईन तिकिट बुकिंग संबंधित एक नवीन नियम लागू केला आहे. रेल्वेने अर्थात आयआरसीटीसीने ऑनलाईन तिकिट बुकिंगबद्दल केलेल्या बदलांचा फायदा आता सर्वसामान्य प्रवाशांना मिळणार आहे. पूर्वी अनेक तिकिट लाटणारे दलाल होते, ज्यांच्यामुळे सर्वसामान्यांना तिकिट बुकिंग करता येत नव्हती. अवघ्या काही तासांमध्येच संपूर्ण ट्रेन हाऊसफुल्ल होत होती. आता ह्या दलालांच्या घुसखोरीचा प्रकार काही अंशी थांबणार आहे.
एजंटस मुळे कन्फर्म तिकीट मिळत नाही, त्यांना आता दिलासा मिळणार आहे. ऑनलाईन तिकिट बुकिंगसाठीचे बदल येत्या १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. १ ऑक्टोबर २०२५ पासून ऑनलाईन तिकिटाचं रिझर्व्हेशन सुरु झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांमध्ये तेच यूजर्स तिकीट बुक करु शकतात ज्यांचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे. हा नियम आयआरसीटीसीच्या वेबसाईट आणि मोबाईल ॲपसाठी लागू असणार आहे.
advertisement
अलीकडेच, रेल्वे मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या उपाय योजनेचा उद्देश ज्या युजर्सचे आधार व्हेरिफिकेशन झालेले असेल त्यांनाच आरक्षण प्रणालीचे फायदे मिळतील. हा नियम काढण्याचा अट्टाहास एकच की, खऱ्या युजर्सला ऑनलाईन तिकिट बुकिंगचा फायदा मिळावा आणि अनधिकृत व्यक्तींकडून होणारा गैरवापर रोखणे हा आहे. वेगवेगळ्या रेल्वे प्लॅटफॉर्म्सवरील तिकिट बुकिंग काऊंटरवर एजंट्सकडून सामान्य आणि राखीव तिकिटे बुक करण्याचा प्रकार अद्यापही बदललेला नाही. अधिकृत रेल्वे तिकीट एजंट्सना सुरुवातीच्या दिवसाच्या आरक्षित तिकिटांचे बुकिंग करण्यासाठी एकूण १० मिनिटांचीच मर्यादा कोणत्याही बदलाशिवाय लागू राहील, असे मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
advertisement
यापूर्वी रेल्वेने १ जुलैपासून तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार व्हेरिफिकेशन करणं आवश्यक केलं होतं. आता रेल्वेचं आरक्षित ऑनलाईन तिकिट बुक करण्यासाठीही आधार व्हेरिफिकेशन आवश्यक केलं आहे. रेल्वेचा हा निर्णय तिकीट बुकिंग सुरु झाल्यानंतर सामान्य प्रवाशांना तिकीट बुक करता यावं यासाठी करण्यात आला आहे. काही एजंट तिकीट बुकिंग सुरु झाल्यानंतर सॉफ्टवेअरच्या मदतीने काही तासातच मोठ्या प्रमाणावर तिकीट्स लाटण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे सामान्य प्रवाशांना तिकीट बुक करता येत नाही. आता आधार व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून प्रवासी तिकीट बुक करू शकणार आहेत.
advertisement
सेंटर फॉर रेल्वे इन्फॉरमेशन सिस्टम्स आणि आयआरसीटीसीला नवीन आलेल्या अपडेटप्रमाणे 1 ऑक्टोबरपर्यंत तांत्रिक बदल करण्याचे आदेश दिले आहेत. प्रवाशांना नव्या नियमांबद्दल माहिती जाणून घ्यायची असल्यास रेल्वेच्या वेबसाईटलाही तुम्ही भेट देऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकता. रेल्वे मंत्रालयाने नव्या अपडेटचे परिपत्रक सर्व विभागांना पाठवले आहे. रेल्वेने घेतलेल्या निर्णयामुळे ऑनलाईन तिकीट बुकिंगमध्ये अधिक पारदर्शकता वाढेल. आधार लिंकमुळे प्रवाशांना सुरुवातीच्या वेळेत तिकीट बुक करता येईल. शिवाय, ई-तिकिट मिळवणं सुरक्षित होईल.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Train Ticket Rules : 10 मिनिटांमध्ये ट्रेन फुल्ल... दलालांना त्रासलेल्या प्रवाशांना दिलासा देणारी बातमी; ऑनलाईन तिकिटाबद्दल नियम काय ?
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement