New Year 2025 : ऐकावं ते नवलच! नवीन वर्षात करतात कुत्र्याच्या मुर्तीची पूजा, रत्नागिरीत आहे अनोखी प्रथा

Last Updated:

रत्नागिरीतील एका गावात कुत्र्याच्या मुर्तीची पूजा करून नवीन वर्षांच सेलिब्रेशन केलं जातं. मात्र अशाप्रकारे सेलिब्रेशन करण्यामागचं कारण काय? आणि रत्नागिरीतील त्या गावात अशी प्रथा कशी सुरु झाली? हे जाणून घेऊयात.

ratnagiri guhagar new year
ratnagiri guhagar new year
रत्नागिरी/गुहागर, राजेश जाधव : नवीव वर्षाचं सेलिब्रेशन म्हटलं तर डोळ्यासमोर आलिशान हॉटेल, पब अशीच चित्रे उभी राहतात. कारण या ठिकाणी तरूण-तरूणी किंवा कुटुंबिय जाऊन नवीन वर्षाच्या निमित्ताने भन्नाट सेलिब्रेशन करून मौजमजा करतात. मात्र रत्नागिरीतील एका गावात कुत्र्याच्या मुर्तीची पूजा करून नवीन वर्षांच सेलिब्रेशन केलं जातं. मात्र अशाप्रकारे सेलिब्रेशन करण्यामागचं कारण काय? आणि रत्नागिरीतील त्या गावात अशी प्रथा कशी सुरु झाली? हे जाणून घेऊयात.
रत्नागिरीच्या गुहागर मधील चिखली गावामध्ये नवीन वर्षाची सुरुवात कुत्र्याच्या मूर्तीच्या पूजनाने होते. ही प्रथा आहे गुहागर तालुक्यातील चिखली गावातील चांदिवडे वाडी मधली आहे. इथे नवीन वर्षाची सुरुवात बाला नावाच्या कुत्र्याच्या मूर्तीच्या पूजनाने होत असून या कुत्र्याच्या स्मृती प्रित्यर्थ गावकऱ्यांनी त्याचे मंदिरही बांधले आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या पूर्वजांनी एक कुत्रा पाळला होता आणि तो कुत्रा जंगली शापदांपासून त्यांच्या गुरांचे व जांगळ्यांचे म्हणजे गुर राखणाऱ्यांचे रक्षण करायचा म्हणून त्याचे आम्ही जांगळदेव नाव ठेवले असून वर्षाच्या सुरुवातीलाच त्याच्या स्मृती प्रित्यर्थ सत्यनारायणाची पूजा घालून महाप्रसादही करतो.
advertisement
बाला आमच्या गावाची जंगली श्वापदांपासून रक्षण करायचा त्याचबरोबर आमच्या गुराख्यांचेही रक्षण करायचा. तो जेव्हा मृत्यू पावला त्याला ज्या ठिकाणी दफन केले त्याच ठिकाणी आम्ही मंदिर बांधले आहे, एका कुत्र्याच्या नावाने मंदिर बांधून दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीलाच त्याची मनोभावे पूजा अर्चना करणे हा अनोखा प्रकार गुहागर तालुक्यातील चिखली गावातील चांदिवडेवाडी मागील कित्येक वर्ष करीत आहेत. त्यामुळे या घटनेची चर्चा सर्वदूर सूरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
New Year 2025 : ऐकावं ते नवलच! नवीन वर्षात करतात कुत्र्याच्या मुर्तीची पूजा, रत्नागिरीत आहे अनोखी प्रथा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement