Pune Mahapalika: अजितदादांकडून पुण्यात गुंडांच्या घरात तिकीटं, नीलेश लंके म्हणाले...

Last Updated:

राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, असे खासदार नीलेश लंके म्हणाले.

नीलेश लंके-अजित पवार
नीलेश लंके-अजित पवार
गोविंद वाकडे, प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या निवडीवरून तीव्र टीका होत आहे. पुणे शहरात अजित पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून गुन्हेगारांच्या कुटुंबातील एकूण चार सदस्यांना उमेदवारी दिली आहे. या प्रकारावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांना विचारले असता, त्यांनी अजित पवार यांचे चक्क समर्थन केले.
राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, तसेच कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनाही आनंद होईल, असे अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांनी स्पष्ट केले आहे.

उमेदवार पात्र असल्यामुळेच त्यांना संधी असेल ना...!

पिंपरी-चिंचवड आणि पुण्याचा विकास शरद पवारांनी केला असून अजित पवारांनीही त्याच पावलावर पाऊल ठेवून काम केल्याचं लंके म्हणाले. तसेच पुण्यात अजित पवार गटाने गुन्हेगारांना दिलेल्या उमेदवारीवरून बोलताना, उमेदवार पात्र असल्यामुळेच त्यांना संधी देण्यात आली असेल, असे म्हणत अजित पवार यांच्या गुंडांना उमेदवारी देण्याचे नीलेश लंके यांनी आश्चर्यकारकरित्या समर्थन केले.
advertisement

भाजप राष्ट्रवादीत निकराची लढाई

भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी ज्या ठिकाणी आपली प्रतिष्ठा पणाला लावलीय त्या पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून उमेदवारांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केलीय. राष्ट्रवादीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार निलेश लंके आज दिवसभर मतदारांना साद घालताना दिसले. तर इकडे भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे हे देखील उमेदवार असल्याने निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे , इतर उमेदवारांसह स्वतःचा प्रचार करताना त्यांची दमछाक होताना दिसतेय. मात्र , विकासाच्या मुद्द्यावर जनता आपल्याला कौल देईल आणि पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करत अनेक केंद्रीय आणि राज्यातील भाजपचे बडे नेते शहरात सभा घेणार असल्याची माहिती काटे यांनी दिलीय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune Mahapalika: अजितदादांकडून पुण्यात गुंडांच्या घरात तिकीटं, नीलेश लंके म्हणाले...
Next Article
advertisement
US Attack Venezuela Gold Price: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदाजाने गुंतवणूकदारांची झोप उडणार!
अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदा
  • अमेरिकेने व्हेनेझुएला देशावर हल्ला करत राष्ट्रपती मादुरो यांना अटक केली.

  • व्हेनेझुएला हा देश सर्वाधिक तेल उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक

  • अमेरिकेच्या हल्ल्याचे परिणाम बाजारावरही होणार असल्याचे संकेत

View All
advertisement