ऑनस्क्रीन 'भाऊ-बहीण', पण खऱ्या आयुष्यात 'नवरा-बायको'; कोण आहे तमिळ सिनेसृष्टीतील ही जोडी?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सिनेमाच्या चंदेरी दुनियेत काम करणाऱ्या कलाकारांचे आयुष्य अनेकदा एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखेच रंजक असते. कधी शूटिंगदरम्यान दोन कलाकारांचे सूत जुळते, तर कधी मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते.
चित्रपटातील नायक-नायिकेच्या प्रेमाच्या गोष्टी आपण नेहमीच ऐकतो. पण जेव्हा पडद्यावर भाऊ-बहिणीची भूमिका साकारणारे कलाकार खऱ्या आयुष्यात जीवनसाथी बनतात, तेव्हा ती चर्चा रंगणारच. सिनेमाच्या चंदेरी दुनियेत काम करणाऱ्या कलाकारांचे आयुष्य अनेकदा एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखेच रंजक असते. कधी शूटिंगदरम्यान दोन कलाकारांचे सूत जुळते, तर कधी मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते.
advertisement
advertisement
सी. आर. विजयकुमारी यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'कुला देवम' या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात राजेंद्रन मुख्य भूमिकेत होते. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच विजयकुमारी यांच्या मातोश्रींचे निधन झाले. या दुःखद प्रसंगात त्या पूर्णपणे खचून गेल्या होत्या. अशा कठीण काळात एस. एस. राजेंद्रन यांनी त्यांना मोठा आधार दिला. याच आधारातून दोघांमध्ये प्रेम फुलले आणि 1961 मध्ये त्यांनी विवाह केला.
advertisement
या जोडीच्या आयुष्यातील सर्वात रंजक वळण 1963 मध्ये आले. लग्नाला दोन वर्षे उलटल्यानंतर त्यांचा 'कैथियिन कधली' (Kaithiyin Kadhali) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा आणि संवाद ए. के. वेलन यांनी लिहिले होते. मजेशीर बाब म्हणजे, या चित्रपटात एस. एस. राजेंद्रन आणि सी. आर. विजयकुमारी यांनी भाऊ-बहिणीची भूमिका साकारली होती.
advertisement
चित्रपटाच्या कथेत नायक (राजेंद्रन) एका गरीब कुटुंबातील असतो, जो परिस्थितीमुळे जेलमध्ये जातो. बाहेर आल्यावर तो आपल्या कुटुंबाचा शोध घेतो आणि त्याला आपली बहीण (विजयकुमारी) सापडते. ज्या काळात प्रेक्षकांना हे दोघे पडद्यावर बहीण-भाऊ म्हणून रडवत होते, त्याच वेळी खऱ्या आयुष्यात ते पती-पत्नी म्हणून सुखाचा संसार करत होते.
advertisement
advertisement
advertisement










