कोकणात शिमगा, राणे-ठाकरेंचे कार्यकर्ते भिडले, देवगडमधल्या राड्याचा Video
- Published by:Shreyas
Last Updated:
देवगडमध्ये भाजप आमदार नितेश राणे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे.
विशाल रेवडेकर, प्रतिनिधी
सिंधुदुर्ग, 9 ऑक्टोबर : देवगडमध्ये भाजप आमदार नितेश राणे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. देवगड रुग्णालयाच्या सुविधांवरून दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली, या शाब्दिक चकमकीचं रुपांतर काही वेळाने झटापटीत झालं. भाजप कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली, तसंच दोन्ही कडचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले, पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना आवरलं.
advertisement
आमदार नितेश राणे हे आपल्या मतदारसंघात पोहोचले होते, त्यांनी आरोग्य व्यवस्थेबद्दलच्या आढावा बैठकीला ते उपस्थित होते. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सिव्हिल सर्जन यांना बैठकीला बोलावण्यात आलं होतं. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते बैठकीदरम्यान आले आणि त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. नितेश राणे यांनी आंदोलन करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना इकडे कशासाठी बसला आहात? असं विचारलं. तसंच तुमच्या मागण्या आणि अडचणी स्पष्ट करायला सांगितलं.
advertisement
यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचं रुपांतर काही वेळाने हाणामारीमध्ये झालं.
view commentsLocation :
First Published :
October 09, 2023 7:05 PM IST


