'प्लिज...सोडून द्या...मारू नका', महिला विनवणी करत राहिली, पण टोळीने माजी सरपंचांचा जीव घेतला

Last Updated:

छत्रपती संभाजीनगर शहरातील जटवाड्याजवळील ओहर गावात माजी सरपंच दादा सांडू पठाण यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अकरा जणांच्या टोळीने दिवसाढवळ्या लोखंडी रॉडने हल्ला करत दादा पठाण यांचा जीव घेतला.

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील जटवाड्याजवळील ओहर गावात माजी सरपंच दादा सांडू पठाण यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अकरा जणांच्या टोळीने दिवसाढवळ्या लोखंडी रॉडने हल्ला करत दादा पठाण यांचा जीव घेतला. या हत्येचा EXCLUSIVE VIDEO आता समोर आला आहे. या व्हिडीओत एक महिला जिवाच्या आकांताने ओरडताना दिसत आहे. ती मारेकऱ्यांना हात जोडून विनवणी करत आहे. मारू नका म्हणत आहे.
तरीही राक्षसी वृत्तीचे हल्लेखोर शिवीगाळ करत दादा पठाण यांच्यावर वार करताना दिसत आहेत. हा हल्ला इतका भयंकर होता की दादा पठाण यांचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्याचा व्हिडीओ आता समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गावातील जमीनीच्या वादातून माजी सरपंचाची ही हत्या झाली आहे.

नेमकी घटना काय घडली?

advertisement
मागील अनेक वर्षांपासून गावातीलच जमिनीवरील ताब्यावरून हा वाद सुरू होता. याच वादातून बुधवारी दुपारी अकरा जणांच्या गावगुंडांच्या टोळीने जटवाडा रस्त्यावरील ओव्हरगावचे माजी सरपंच दादा सांडू पठाण यांची क्रूरपणे हत्या केली. एकीकडे पठाण यांच्या कुटुंबातील महिला हल्लेखोरांना हात जोडून वाद मिटवण्यासाठी विनवण्या करत होत्या. तेव्हा डोक्यात गुंडगिरी भिनलेली क्रूर टोळी मात्र लाठ्याकाठ्या आणि लाथाबुक्क्यांनी पठाण यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर घाव घालत होती. या हल्ल्यात दादा पठाण यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
इम्रान खान मोईन खान पठाण, जमीर इनायत खान पठाण, मोसीन मोईन खान पठाण, अफरोज खान गयाज खान, अस्लम गयाज पठाण ऊर्फ गुड्डू, हैदर खान गयाज खान पठाण, समीर जमीर पठाण, उमेर जमीर पठाण, फुरकान अजगर पठाण, रामअवतार सागरमल साबू, मोईन इनायत खान पठाण अशी हल्लेखोरांची नावे आहेत. यातील एका आरोपीला रात्रीच अटक केली होती. तर दोन आरोपींना आज सकाळी अटक केली आहे.
advertisement
आता माजी सरपंच हत्या प्रकरणात नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आरोपींना तत्काळ अटक करा. आरोपींचं जमीनीवरील अतिक्रमण काढा, यासाठी नातेवाईकांनी अंत्यविधी न करता रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे. जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. आंदोलकांमध्ये महिलांचा समावेश अधिक आहे.
advertisement

नेमका वाद काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, पठाण यांचं कुटुंब मूळ ओव्हरगावचेच रहिवासी आहे. त्यांच्या घरासमोरच त्यांची शेती आहे. काही अंतरावर शाळेजवळ त्यांची जमीन आहे. या जमिनीच्या शेजारून एक वाट जाते. सुरुवातीला आरोपींच्या टोळीने या छोट्या वाटेवरून वाद घालण्यास सुरुवात केली होती. कालांतराने त्यांनी संपूर्ण जमिनीवरच दावा करण्यास सुरुवात केली. यातून अनेकदा वाद झाले. बुधवारी पठाण यांनी जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी जेसीबी बोलावला होता. यावेळी दहा ते अकरा जणांच्या टोळीने पठाण यांच्यावर लाठ्याकाठ्या आणि रॉडने हल्ला केला. यात दादा पठाण यांचा जागीच मृत्यू झाला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'प्लिज...सोडून द्या...मारू नका', महिला विनवणी करत राहिली, पण टोळीने माजी सरपंचांचा जीव घेतला
Next Article
advertisement
Satej Patil : सतेज पाटलांना विरोधी पक्षनेते पद मिळू नये धडपड? प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन
प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..
  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

View All
advertisement