Meenatai Thackeray: मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंगफेक प्रकरणात एक जण ताब्यात, तपासाला वेग

Last Updated:

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकण्याचा खोडसाळपणा नेमका केला कुणी याचा शोध सुरू असून या प्रकरणी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आला आहे.

News18
News18
मुंबई : बाळासाहेबांच्या पत्नी मिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर काही अज्ञातांनी रंग उडवल्यामुळे खळबळ माजली. मीनाताईंचा हा पुतळा मुंबईच्या अत्यंत वर्दळीच्या असलेल्या शिवाजी पार्क भागात आहे. मीनाताई ठाकरे प्रत्येक शिवसैनिकाला आदरस्थानी असल्याने या घटनेमुळे काही काळ तणावही निर्माण झाला. या घटनेनंतर दोन्ही ठाकरे बंधुंनी पुतळ्याची पाहणीसुद्धा केली. त्यानंतर कृ्त्य करणाऱ्या खोडसाळ व्यक्तीचा शोध सुरू झाला. अखेर 12 तासानंतर एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आङे.
बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या मुख्यप्रवेशद्वारावर आहे. पुतळ्यावर रंग टाकण्याचा खोडसाळपणा नेमका केला कुणी याचा तातडीचा शोध सुरु झाला. पण या परिसरात असलेल्या पाच पैकी एकाही सीसीटिव्हीचा अँगल मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याकडे नसल्याचं आता समोर आलंय. आणि पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित केलं गेलं. अखेर संध्याकाळी पोलिसांनी एक संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे.
advertisement

घटनेवरुन संतप्त प्रतिक्रिया 

सकाळच्या सुमारास मीनाताई ठाकरेंच्या अर्धाकृती पुतळ्यावर अज्ञाताने लाल रंग फेकल्याची घटना समोर आणि शिवसैनिकांनी पुतळ्याजवळ धाव घेतली. शिवसैनिकांनी तात्काळ या परिसराची साफसफाई केली. पण त्याचसोबत या घटनेवरुन संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या. या घटनेची माहिती मिळताच राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंनी स्मृती स्थळावर येत पाहणी केली. तसेच या प्रकारे मागे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला.
advertisement

ठाकरेंची शिवसेना उद्या पुतळ्यासमोर CCTV कॅमेरा लावणार

छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे… मात्र या ठिकाणी असलेल्या 5 सीसीटीव्ही कॅमेरांपैकी एकाचाही ॲंगल मॅासाहेबांच्या पुतळ्यावर नाहीये. त्यामुळे  पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करणारे सीसीटीव्ही मध्ये रेकॅार्डच झाले नसल्याची माहीती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्या सकाळी मीनाताईंच्या पुतळ्यासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार आहे.
advertisement

रंग टाकण्याच्या प्रकाराचा निषेध 

मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकण्याच्या प्रकाराचा निषेध सर्वपक्षियांनी केला आहे. सोबतच असं कृत्य करणाऱ्यांना अद्दल घडवण्याची मागणीही जोर धरत आहे. या सगळ्या घटनेनंतर किशोरी पेडणेकरांच्या प्रतिक्रियेनं लक्ष वेधून घेतलं. त्यांनी ही घटना जाणीवपूर्वक घडवली गेली आहे का याकडे लक्ष वेधलं
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Meenatai Thackeray: मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंगफेक प्रकरणात एक जण ताब्यात, तपासाला वेग
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement