राजमाता जिजाऊ बदनामी प्रकरणात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीही झुकली! 22 वर्षानंतर ऐतिहासिक माफी

Last Updated:

2003 मध्ये छत्रपती उदयनराजे महाराजांनी पत्र ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला पत्र पाठवले होते.

News18
News18
पुणे : महाराष्ट्रात दोन दशकांपूर्वी जेम्स लेनच्या शिवाजी-हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकावरून मोठा गदारोळ झाला होता. या पुस्तकात राजमाता जिजाऊसाहेब यांच्याबाबत वादग्रस्त मजकूर छापला होता. शिवाजी महाराजांच्या जीवनाची माहिती देणाऱ्या या पुस्तकात जिजाऊंबद्दल बदनामीकारक मजकूर छापण्यात आला होता. त्याविरोधात महाराष्ट्रात आणि विशेषतः पुण्यात हिंसक पडसात उमटले होते. अखेर 22 वर्षानंतर या पुस्तकाचे प्रकाशक असलेल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं जाहीर माफी मागितली आहे.
जेम्स लेन हा अमेरिकेतले इतिहास आणि धर्म या विषयांचा प्राध्यापक आहे. पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्यातल्या वादग्रस्त मजकुरावरून महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या पुस्तकासाठी पुण्यातील काही इतिहास संशोधकांनी मदत केल्याचा आरोप करत पुण्यात संभाजी बिग्रेड आक्रमक झाली होती. संभाजी ब्रिगडच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर हल्ला केला. या हल्ल्याला आणि निदर्शनांना ब्राह्मण विरुद्ध मराठा असा जातीय रंग देखील देण्यात आला होता. 2003 मध्ये छत्रपती उदयनराजे महाराजांनी पत्र ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला पत्र पाठवले होते. अखेर दोन दशकानंतर पत्राला उत्तर देत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने आज माफी मागितली आहे.
advertisement

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने मागितली माफी

ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस ही चालवण्यात येते. 2003  मध्ये हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं होतं. यातील काही मजकुरावर आक्षेप घेण्यात आला होता. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून उदयनराजे भोसले आणि महाराष्ट्रातील जनतेची माफी मागत जाहीर निवेदन प्रसिद्ध केलंय.

भांडारकर संस्थेवर कारवाई करणार का? संभाजी ब्रिगेडचा सवाल

त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जानेवारी 2004 रोजी संभाजी ब्रिगेड ने भांडारकर संस्थेवर या लिखाणाच्या विरोधात कारवाई केली होती. परंतु सरकारने भांडारकर संस्थेमधील जेम्स लेना मदत करणाऱ्या वर कुठलीही कारवाई केली नाही. संभाजी ब्रिगेडची मागणी आहे की, महाराष्ट्र सरकार आता भांडारकर संस्थेवर कारवाई करणार का? असा सवाल संभाजी ब्रिगेडने केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राजमाता जिजाऊ बदनामी प्रकरणात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीही झुकली! 22 वर्षानंतर ऐतिहासिक माफी
Next Article
advertisement
Santosh Dhuri Attack Raj Thackeray: कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
  • मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला

  • संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल

  • राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटल

View All
advertisement