Pankaja Munde : पंकजा मुंडेंना विधानपरिषद का राज्यसभा? भाजपचं ठरलं; मोठं पदही मिळणार!
- Published by:Shreyas
Last Updated:
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं लवकरच राजकीय पुनर्वसन होणार आहे. पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर पाठवायचं का राज्यसभेवर? याबाबतचा निर्णय भाजपने घेतला आहे.
राहुल झोरी, प्रतिनिधी
मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं लवकरच राजकीय पुनर्वसन होणार आहे. पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागणार आहे. पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू होती, पण आता पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर घेऊन त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 12 जुलैनंतरच होणार असल्याची शक्यता आहे. पंकजा मुंडेंना ताकद देऊन भाजप झालेलं नुकसान विधानसभेत भरून काढण्याच्या तयारीमध्ये आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं होतं, पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव केला होता.
advertisement
याआधी 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का लागला होता. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना पराभूत केलं होतं. तेव्हापासूनच पंकजा मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा सुरू होती. आता 5 वर्षानंतर पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर पाठवून त्यांना मंत्रिपद द्यायचा भाजपचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 27, 2024 4:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pankaja Munde : पंकजा मुंडेंना विधानपरिषद का राज्यसभा? भाजपचं ठरलं; मोठं पदही मिळणार!