Panvel Elections : कल्याण-डोंबिवलीकडे सगळ्यांचं लक्ष, पण भाजपचा पनवेलमध्ये करेक्ट कार्यक्रम, 7 उमेदवार बिनविरोध!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
महाराष्ट्राच्या 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी अर्ज मागे घ्यायचा आजचा शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी भाजप-शिवसेनेने महाविकासआघाडीला जोरदार धक्का दिला आहे.
पनवेल : महाराष्ट्राच्या 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी अर्ज मागे घ्यायचा आजचा शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी भाजप-शिवसेनेने महाविकासआघाडीला जोरदार धक्का दिला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप-शिवेसनेचे 21 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत, यात भाजपचे 15 आणि शिवसेनेचे 6 उमेदवार आहेत. सगळ्यांचं लक्ष कल्याण-डोंबिवलीमध्ये असतानाच भाजपने पनवेलमध्येही करेक्ट कार्यक्रम केला आहे. पनवेलमध्ये भाजपचे तब्बल 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी 7 जणांनी माघार घेतली.
पनवेल महानगरपालिकेमध्ये 7 उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर भाजपच्या 7 जणांची बिनविरोध निवड झाली आहे, पण निवडणूक आयोगाकडून याची अधिकृत घोषणा व्हायची बाकी आहे. अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.
भाजपचे 7 उमेदवार बिनविरोध
1) नितीन पाटील
2) रुचिता लोंढे
advertisement
3) अजय बहिरा
4) दर्शना भोईर
5) प्रियंका कांडपिळे
6) ममता प्रितम म्हात्रे
7) स्नेहल ढमाले
पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुती एकत्र निवडणूक लढत आहे. एकूण 78 जागांपैकी भाजप सर्वाधिक 71, शिवसेना 4, राष्ट्रवादी काँग्रेस 2 आणि आरपीआय आठवले गट एका जागेवर रिंगणात आहे. तर दुसरीकडे महाविकासआघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष मोठा भाऊ आहे. पनवेलमध्ये शेकाप 33, शिवसेना उबाठा 19, काँग्रेस 12, राष्ट्रवादी शरद पवार 7, मनसे 2, सपा 1 आणि वंचित बहुजन आघाडी एक जागेवर निवडणूक लढत आहे.
advertisement
याआधी 2017 साली पनवेल महानगरपालिकेमध्ये निवडणूक झाली होती, तेव्हा भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली होती. भाजपला 2017 साली 51 जागा मिळाल्या होत्या, तर शेकापला 23, काँग्रेसला 2 आणि राष्ट्रवादीला 2 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.
view commentsLocation :
Panvel,Raigad,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 4:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Panvel Elections : कल्याण-डोंबिवलीकडे सगळ्यांचं लक्ष, पण भाजपचा पनवेलमध्ये करेक्ट कार्यक्रम, 7 उमेदवार बिनविरोध!










