२ कोटींची लाच मागितेलल्या PSI ला दणका, CP विनयकुमार चौबे यांनी आदेश काढले

Last Updated:

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चिंतामणीला 2 नोव्हेंबर रोजी 46 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते.

प्रमोद चिंतामणी (पोलीस उपनिरीक्षक)
प्रमोद चिंतामणी (पोलीस उपनिरीक्षक)
गोविंद वाकडे, प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड: दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या गंभीर आरोपात अडकलेले पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणीला अखेर शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे यांनी या कठोर कारवाईचे आदेश जारी केले आहेत.
प्रमोद चिंतामणी याच्यावर लाचखोरीसोबतच पिंपरी-चिंचवड शहरातील 40 हून अधिक नागरिकांची पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून सुमारे 5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचाही आरोप आहे. फसवणुकीचे पैसे ते आपल्या मेहुण्याच्या बँक खात्यावर जमा करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

कारवाईनंतर घरातून 51 लाख रुपयांची रोकड जप्त

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चिंतामणीला 2 नोव्हेंबर रोजी 46 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते. या प्रकरणात त्याने लाचेची मागणी त्यांनी 2 कोटी रुपयांची लाच मागितली होती. या कारवाईनंतर त्यांच्या घरातून 51 लाख रुपयांची अतिरिक्त रोकड जप्त करण्यात आली होती.
advertisement

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आदेश काढले

दरम्यान, लाच प्रकरणाच्या वेळी प्रमोद चिंतामणी हा आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होता. अनेक गैरकृत्यांचा तपशील समोर आल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी त्यांच्या बडतर्फीचे आदेश दिले आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
२ कोटींची लाच मागितेलल्या PSI ला दणका, CP विनयकुमार चौबे यांनी आदेश काढले
Next Article
advertisement
Gold Price Prediction 2026: ...तर, २०२६ मध्ये सोनं होणार २० टक्क्यांनी स्वस्त! 'या' एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

View All
advertisement