माझा नवऱ्याच्या पाठीत जवळच्या व्यक्तीने खंजीर खुपसला, खरातच्या पत्नीचा खळबळजनक दावा; नेमका रोख कुणाकडे?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
काही जवळच्या व्यक्तींनी पाठीत खंजीर खुपसून प्रतिमा मलीन केल्याचा दावा अशोक खरातच्या पत्नी कल्पना खरात यांनी केला आहे.
मुंबई : धर्माच्या नावाखाली अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेला भोंदू बाबा अशोक खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. तपासादरम्यान त्याच्या अघोरी आणि अश्लील कृत्याचे व्हिडिओही पोलिसांच्या हाती लागलेत. या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. वासनांध अशोक खरातमुळे रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. दरम्यान भोंदू अशोक खरातच्या एकापेक्षा एक सुरस कथा बाहेर येत असतानाच भोंदू अशोक खरातच्या पत्नीने खळबळदनक आरोप केला आहे. काही जवळच्या व्यक्तींनी पाठीत खंजीर खुपसून प्रतिमा मलीन केल्याचा दावा अशोक खरातच्या पत्नी कल्पना खरात यांनी केला आहे. हा दावा त्यांनी हिंदुस्थान टाईम्स या वृत्तपत्राशी बोलताना केला आहे.
मर्चंट नेव्हीतून निवृत्त झालेला कॅप्टन अशोक खरात गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जात होते, मात्र या भोंदू बाबाचा आता पर्दाफाश झाला. खरातचा अघोरी आणि विकृत चेहरा समोर आलाय. अशोक खरात सध्या पोलीसांच्या ताब्यात असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे.
advertisement
नेमकं काय म्हणाल्या खरातच्या पत्नी?
माझे पती काही व्यावसायिक ज्योतिषी नाहीत. काही जवळच्या व्यक्तींनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. माझ्या पतीची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचा आरोप अशोक खरातची पत्नी कल्पना यांनी केली आहे. खरात प्रकरणावर त्याच्या जवळच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
आतापर्यंत काय काय समोर आलं?
advertisement
अडचणीत सापडलेले किंवा अध्यात्मीक अस्थेपोटी लोक या स्वयंघोषित ज्योतिषाकडे येत होते पण त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा हा भोंदू कॅप्टन घेत राहिला, त्याच्या या दृष्कृत्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. महिलेसोबत आलेल्यांना तो ऑफीसबाहेर ध्यान करायला बसवायचा आणि ऑफिसात एकट्या असलेल्या महिलेला मी कृष्ण आणि तू गेल्या जन्मीची राधा असल्याचं सांगून गुंगीचं औषध देत आणि लैंगिक शोषण करायचा अशी माहिती समोर आलीय. ज्यात भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांची चर्चा आहे. कोट्यावधीची संपत्ती जमवल्यासह महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा या भोंदूबाबा अशोक खरातवर आरोप आहे. रुपाली चाकणकर यांचे भोंदू अशोक खरात याच्यासोबतचे काही फोटो, व्हिडीओ समोर आल्यावर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 9:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
माझा नवऱ्याच्या पाठीत जवळच्या व्यक्तीने खंजीर खुपसला, खरातच्या पत्नीचा खळबळजनक दावा; नेमका रोख कुणाकडे?








