advertisement

Pandharpur: चतूर सून निघाली किलर, सासूला मारायला गेली अन् नवरा गमावला, वेब सीरिजला लाजवेल अशी पंढपूरमधली घटना

Last Updated:

या ना त्या कारणावरून सासू आणि सुनेनं वाद आणि भांडणं ही प्रत्येक घरातली गोष्ट आहे. पण, पंढरपूरमध्ये सिनेमाला लााजवेल अशी घटना घडली आहे

News18
News18
पंढरपूर : सासू आणि सुनेचं भांडण नवीन नाही. या ना त्या कारणावरून सासू आणि सुनेनं वाद आणि भांडणं ही प्रत्येक घरातली गोष्ट आहे. पण, पंढरपूरमध्ये सिनेमाला लााजवेल अशी घटना घडली आहे. सासूला मारण्यासाठी सूनेनं चहामध्ये विषारी औषध टाकून पाजण्याचा प्रयत्न केला. पण, सूनेच्या नवऱ्याने पाणी प्यायल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. एखाद्या सिनेमाला लाजवेल अशा घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सून आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढपूरमधील  उंबरगाव इथं ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात समाधान गणपत लोहार (वय ३४)  यांचा मृत्यू झाला आहे. तर सारीका लोहार (वय ३२) असं या सूनेचं नाव आहे. २०१३ मध्ये सारीका आणि समाधान यांचं लग्न झालं होतं. पण, लग्नाचे नऊ दिवस संपल्यानंतर सासू विमल आणि सारीका यांच्यामध्ये वाद होत होता. सासू आणि सुनेमध्ये दिवसेंदिवस हा वाद विकोपाला गेला होता.
advertisement
सारीकाचं प्रेम प्रकरण समोर
अशातच चार वर्षांपासून आरोपी सून सारीकाची गावातील शेखर संताराम चंदनशिवे याच्याशी ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. याची कुणकुण सासू विमल यांना लागली. त्यामुळे त्यांनी सारिकावर संशय घेतला. या कारणावरून विमल आणि सारिका यांच्यामध्ये आणखी वाद पेटला. सासू विमल यांनी सारिकावर संशय घेतला, त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर दोघींनी एकमेकांपासून बोलणं बंद केलं.
advertisement
सारीकाने सासूला संपवण्याचा रचला कट
१० जानेवारी २०२६ रोजी प्रियकर शेखर याने सारीकाला गावातील एका शेतात बोलावलं. यावेळी त्याने सारिकाला एक पांढऱ्या रंगााची विषारी औषधाची बाटली आणि अर्धवट पाण्याची भरलेली बाटली दिली. आपल्या प्रेमात अडथळा येत असलेल्या सासूला संपवण्यासाठी हे विष आणलं होतं. घरात गेल्यानंतर कळशीमध्ये हे विषारी औषध टाकून दे, असं प्रियकराने साारिकाला समजावलं. घरी गेल्याानंतर सारिकाने रात्री घरात कुणी नसताना सासूच्या पिण्यासाठी असलेल्या कळशीमध्ये विषारी औषध ओतलं. त्यानंतर पाण्याची बाटली जाळून टाकली. सासू विमल यांनी रात्री घरी आल्यावर पिण्यासाठी तांब्याभर पाणी घेतलं पण चव कडू लागली आणि पाण्याचा रंगही पिवळा दिसत होता. त्यामुळे त्यांनी तो तांब्या आपला मुलगा समाधान याला दाखवण्यासाठी घेऊन गेल्या.
advertisement
पती समाधानने प्यायलं पाणी आणि...
विमल यांनी सारिकाचा पती समाधान याला पाणी दाखवलं आणि तांब्या तिथेच ठेवून दिला. पण, रात्री जेवण झाल्यानंतर समाधान यांनी ताब्यातलं पाणी पिऊन टाकलं. पाणी प्यायल्यानंतर काही तासांनी समाधान यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. अचानक तब्येत खालावली. रात्रीच समाधान यांना रुग्णालयात दाखल केलं. जवळपास ६ दिवस समाधान यांच्यावर उपचार सुरू होते. पण, अखेरीस १६ जानेवारी रोजी समाधान यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
advertisement
सारिका आणि शेखरला अटक
पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा सगळ्या घटना समोर आला. समाधान यांच्यावर उपचार सुरू असताना घरात विष प्रयोग झाल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलिसांनी सखोल तपास केला असता सगळा प्रकार उघड झाला. पोलिसांनी सून सारिका लोहार आणि तिचा प्रियकर शेखर संताराम चंदनशिवे या दोघांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी खाक्या दाखवातच दोघांनी विषारी प्रयोग केल्याचं कबुल केलं. दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pandharpur: चतूर सून निघाली किलर, सासूला मारायला गेली अन् नवरा गमावला, वेब सीरिजला लाजवेल अशी पंढपूरमधली घटना
Next Article
advertisement
Shahid Afridi : पाकिस्तानच्या आफ्रिदीने 140 कोटी भारतीयांचं मन जिंकलं, सचिन-विराटला दिलं मानाचं स्थान, Inside Video
पाकिस्तानच्या आफ्रिदीने 140 कोटी भारतीयांचं मन जिंकलं, सचिन-विराटला दिलं मानाचं
  • पाकिस्तानच्या शाहिन आफ्रीदीच्या व्हिडिओची चर्चा

  • सचिन तेंडुलकर विराटशी ठेवलं खास कनेक्शन

  • आफ्रीदीच्या त्या कृतीने भारतीय फॅन्स खुश

View All
advertisement