मंदिरातून श्रीराम, माता सीतासह 8 देवांच्या मुकुटांची चोरी; फक्त एका देवाला हात लावला नाही, क्रिमिनलची शहारत चर्चा
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Ram Janaki Temple: चित्रकूटमधील भरतकूप येथील प्राचीन राम-जानकी मंदिरात मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी चोरी करत भगवान राम परिवाराचे आठ चांदीचे मुकुट लंपास केले. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
चित्रकूट: जिल्ह्यातील भरतकूप येथे असलेल्या प्राचीन राम-जानकी मंदिरात गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी मोठी चोरी केली. मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप फोडून आणि कडी कटरने कापून आरोपी थेट गर्भगृहापर्यंत पोहोचले. तेथून भगवान राम परिवाराचे आठ मौल्यवान चांदीचे मुकुट चोरी करून नेण्यात आले. सकाळी ही घटना उघडकीस येताच मंदिर परिसरात खळबळ उडाली आणि भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला.
मंदिराचे महंत लवकुश दास यांनी सांगितले की ते मंदिरालगतच्या खोलीत झोपले होते. रात्री कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा आवाज ऐकू आला नाही. मात्र सकाळी पुजारी पूजा करण्यासाठी आले असता तुटलेले कुलूप आणि विस्कळीत सामान पाहून त्यांना धक्का बसला. गर्भगृहातून भगवान श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या एकूण आठ चांदीच्या मुकुटांची चोरी झाल्याचे लक्षात आले. फक्त हनुमानजींचा मुकुट सुरक्षित असल्याचे आढळले. चोरी गेलेल्या मुकुटांचे एकूण वजन सुमारे एक किलो 700 ग्रॅम असल्याचे सांगितले जाते.
advertisement
घटनेची माहिती मिळताच भरतकूप पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून संशयितांची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली आहेत.
महंतांनी सांगितले की 1980 सालीही मंदिरात चोरीची घटना घडली होती. सध्या परिसरात लोकवस्ती आणि दुकाने वाढली असून नियमित गस्त घातली जात असतानाही अशी घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस अधिकारी उपेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की तक्रारीच्या आधारे तपास सुरू असून लवकरच प्रकरणाचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
advertisement
भरतकूप धाम हे श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार त्रेतायुगात भरतजी भगवान रामांच्या राज्याभिषेकासाठी चारही तीर्थांचे पवित्र जल घेऊन येथे आले होते. मात्र भगवान रामांनी अयोध्येला परतण्यास नकार दिल्यानंतर भरतजींनी ते पवित्र जल येथे असलेल्या कूपात अर्पण केले. तेव्हापासून या स्थळाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले असून मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 6:53 PM IST
मराठी बातम्या/देश/
मंदिरातून श्रीराम, माता सीतासह 8 देवांच्या मुकुटांची चोरी; फक्त एका देवाला हात लावला नाही, क्रिमिनलची शहारत चर्चा







