Amol Khotkar Encounter: संभाजीनगरचे पोलीस झाले 'दृश्यम'मधल्या 'अजय' सारखे? 5 किलो सोन्याबद्दल नवा आरोप

Last Updated:

दरोड्यातील संशयित अमोल खोतकर यांच्या घरातही पोलिसांना काही सापडलं नसल्याचा दावा त्याची बहीण रोहिणी खोतकर हिने केला आहे.

News18
News18
छ.संभाजीनगर : एका उद्योजकाच्या घरामध्ये दरोडा पडतो, तब्बल ३० तोळं सोन चोरीला जातं, त्यापैकी अजूनही साडेपाच किलो सोनं आणि ३२ किलो चांदी अजूनही गायब आहे. या प्रकरणात संशयित आरोपीचं एन्काऊंटरही होतं. पण या एन्काउंटरानंतर पोलिसांच्या कारवाईवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. मुळात ज्या आरोपीकडे सोनं होतं हे माहिती असतानाही पोलिसांनी एन्काऊंटर केल्यामुळे  वेगळाच संशय सगळीकडे व्यक्त केला जात आहे. एवढंच नाहीतर मयत खोतकरच्या बहिणीनेही याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणातील संशयित आरोपी अमोल खोतकर एन्काऊंटरमध्ये ठार झाला तसंच या प्रकरणातील 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय..या कारवाईदरम्यान पोलिसांनी 30 तोळं सोनं जप्त केलंय...मात्र या दरोड्यात साडेपाच किलो सोनं आणि 32 किलो चांदी चोरीला गेली होती. त्यामुळे उरलेला मुद्देमाल कुठे गेला असा प्रश्न आता उपस्थित होतोय..
advertisement
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये उद्योजक संतोष लड्डांच्या घरी धाडसी दरोडा पडला होता.  दरोड्यात तब्बल साडे पाच किलो सोनं आणि 32 किलो चांदीची लूट झाली होती. या .दरोड्यातील संशयित आरोपी अमोल खोतकर ला पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं. मात्र चर्चा जोरदार सुरू आहे लुटीतील साडे पाच किलो सोन्याची. पोलिसांच्या दाव्यानुसार मयत अमोल दरोड्याचा खरा सूत्रधार होता आणि लुटीतील सर्व सोनं त्याच्याकडे होतं.
advertisement
दरोड्यात 5 किलो 500 ग्राम सोनं लुटलं त्यापैकी पोलिसांनी हस्तगत केलं केवळ 30 ग्राम सोनं मग उरलेले सोने कुणाकडे? असा प्रश्न पडलाय. लुटीतील सर्व सोनं अमोल खोतकरकडे असल्याचा दावा दरोड्यातील आरोपींचा आणि पोलिसांचा आहे आता अमोल खोतकरने सोने कुठे लपवले? कुणाकडे दिले? हे प्रश्न अनुत्तरित आहे.
पालकमंत्र्यांनी पोलिसांना विचारलं
या प्रकरणात खुद्द पालकमंत्री संजय सिरसाट यांनी लक्ष घातलं आहे. त्यांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेतली. त्यांनीही दरोड्यात सोनं किती लुटलं. लुटीतील सोनं कुठे आहे, हे प्रश्न पोलिसांना विचारले.
advertisement
अमोलचं एन्काउंटर करण्याआधी घरात पोलीस आले होते
दरम्यान,  दरोड्यातील संशयित अमोल खोतकर यांच्या घरातही पोलिसांना काही सापडलं नसल्याचा दावा त्याची बहीण रोहिणी खोतकर हिने केला आहे. अमोल खोतकरचा ज्या दिवशी एन्काऊंटर झाला त्याच दिवशी पोलिसांनी रात्री घराची कसून तपासणी केली. अमोलला मारल्यानंतर त्याच्या गाडीची सुद्धा तपासणी केली एक ग्राम सोनं मिळालं नाही. मला तो याबद्दल काहीही बोलला नाही. दरोडा पडल्याच्या घटनेनंतर माझा भाऊ दहा ते बारा दिवस सगळीकडे फिरत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडलं का नाही किंवा घराची झडती का घेतली नाही. मुळात माझ्या भावाकडे कुठलेही सोने चांदी पैसे नव्हतं, असा दावा अमोल खोतकरच्या बहिण रोहिणीने केला आहे.
advertisement
पाच आरोपी अटकेत, त्यांनाही माहिती नाही सोनं कुठे? 
मुळात, सहा चोरट्यांनी लड्डा यांच्या घरातून सहा चोरट्यांनी या सोनं आणि चांदीवर डल्ला पोबारा केला. या दरोड्यातील पाच आरोपी अटकेत आहेत तर एक एक आरोपी अमोल खोतकर एन्काऊंटरमध्ये मारला गेला. ताब्यात असलेल्या आरोपींकडून केवळ ३0 तोळं सोनं जप्त केलं आहे. या पाच आरोपींच्या म्हणण्यानुसार उर्वरित सोनं मयत अमोल कोतकरकडे होतं..वातावरण शांत झाल्यावर चोरट्यांमध्ये सोन्याची वाटणी होणार होती. मात्र पोलिसांसोबत झालेल्या कथित चकमकीत अमोल कोतकर मारला गेला आणि अमोलनं सोनं कुठे आणि कुणाकडे ठेवले याचा शोध लागत नाहीत. आरोपी अमोल कोतकर याच्या एन्काऊंटरमध्ये त्याच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केलाय. या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणीही त्यांच्याकडून केली जाते आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amol Khotkar Encounter: संभाजीनगरचे पोलीस झाले 'दृश्यम'मधल्या 'अजय' सारखे? 5 किलो सोन्याबद्दल नवा आरोप
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement