सहलीसाठी गोव्याला निघालेल्या वसईतील पोलिसांकडून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न; ग्रामस्थांनी बेदम चोपलं, 5 जणांना अटक

Last Updated:

गोव्याला सहलीसाठी जात असताना वसई येथील पोलिसांनी वाटेत एका तरुणीचा विनयभंग करत तिच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

News18
News18
सिंधुदुर्ग, प्रतिनिधी : एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक निघाले आहेत. गोव्याला सहलीसाठी जात असताना वसई येथील पोलिसांनी वाटेत एका तरुणीचा विनयभंग केला, तसेच तिच्या अपहरणाचा प्रयत्न केला. ही घटना लक्षात येताच संतप्त ग्रामस्थांनी दोन पोलिसांसह पाच जणांना मारहाण केली, तसेच त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जामसंडेमध्ये घडली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत देवगड पोलिसांनी आरोपींना अटक केली. दरम्यान त्यानंतर पोलीस आयुक्तांनी या घटनेची तातडीनं दखल घेऊन या दोन आरोपी पोलिसांवर कारवाई केली. त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार हरिराम मारोती गिते (वय34) आणि प्रवीण रानडे (वय 32)अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत. ते वसई वाहतूक पोलीस शाखेत शिपाई पदावर कर्यरत आहेत. हे दोन्ही पोलीस कर्मचारी आपले मित्र माधव केंद्रे (वय 32) शंकर गिते (वय 32) आणि सतवा केंद्रे (वय 32) यांच्यासोबत रजा घेऊन सहलीसाठी गोव्याला निघाले होते. याचदरम्यान देवगड तालुक्यातील जामसंडे गावातील आनंदवाडी वळणार एक 18 वर्षांची महाविद्यालयीन तरुणी तिच्या घराकडे एकटी जात होती. ती एकटी असल्याचं पाहून पोलिसांनी तिचा विनयभंग केला. या मुलीनं झालेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं मात्र आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर या मुलीचा हात धरून तिला वाहनात खेचत पळून नेण्याचा प्रयत्न केला.
advertisement
मात्र ही घटना तेथील ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानं ग्रामस्थ गोळा झाले. स्थानिकांनी आरोपींना बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सहलीसाठी गोव्याला निघालेल्या वसईतील पोलिसांकडून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न; ग्रामस्थांनी बेदम चोपलं, 5 जणांना अटक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement