Sangli Fire: 2 वर्षांच्या सृष्टीला झोपेतच मृत्यूने कवटाळलं, आईसह आजी-आजोबा कोळसा, सांगलीतील ह्रदयद्रावक घटना
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
विट्यात भांड्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दोन वर्षांच्या मुलीसह चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.अग्निशमन दलासह नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण.....
सांगली: सांगली जिल्ह्यातील विट्यात भांड्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दोन वर्षांच्या मुलीसह चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. विट्यात भांड्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दोन वर्षांच्या मुलीसह चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. अग्निशमन दलासह नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले तरी या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली.
वीज वाहनातील दोषांमुळे ही आग लागली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुकानमालक विष्णू पांडुरंग जोशी (वय 47), त्यांची पत्नी सुनंदा विष्णू जोशी (वय 42), मुलगी प्रियांका योगेश इंगळे (वय 25) आणि नात सृष्टी योगेश इंगळे ( वय 2) अशी मृत चौघांची नावे आहेत. विट्यातील सावरकरनगरमध्ये असणाऱ्या विष्णू जोशी यांचे घर आणि दुकान अशी तीन मजली इमारत आहे. यातील पहिल्या मजल्यावर असलेल्या जय हनुमान स्टील सेंटर दुकानाला आज सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक भीषण आग लागली. या आगीत दुकानमालक जोशी, त्यांची पत्नी सुनंदा, मुलगी प्रियांका आणि नात सृष्टी या चौघांचा होरपळून मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली.
advertisement
भीषण आग लागल्याचे कळताच तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात वाटणारी आग परिसरातील नागरिकांनी विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. विटा नगरपालिकेचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळावर दाखल झाला. सतर्क नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. विट्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या सावरकरनगरमध्ये विष्णू जोशी यांच्या स्वतःच्या तीन मजली इमारतीत पहिल्या मजल्यावर जय हनुमान स्टील सेंटर दुकान आहे. तर उर्वरित इमारतीत जोशी यांचे कुटुंब राहते. दरम्यान आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास जय हनुमान स्टील सेंटर दुकानाच्या शटरमधून अचानक धूर येताना दिसला. या आगीची माहिती विटा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. त्यानंतर तातडीने विटा नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला.
advertisement
घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. या अचानक लागलेल्या आगीत इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर जोशी कुटुंबातील सहाजन अडकले होते. आजुबाजूला घरे एकमेकांना चिटकून असल्याने ही आग विझवण्यासाठी आणि मदत कार्यात अडथळे येत होते. दहा वाजण्याच्या सुमारास कडेगांव, क्रांती साखर कारखाना कुंडल , उदगिरी कारखाना, पलुस आणि तासगाव येथून अग्निशमन वाहने आणून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
November 10, 2025 6:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sangli Fire: 2 वर्षांच्या सृष्टीला झोपेतच मृत्यूने कवटाळलं, आईसह आजी-आजोबा कोळसा, सांगलीतील ह्रदयद्रावक घटना


