advertisement

प्रियांका गांधींनी दिलेला शब्द पाळला, विमानतळावर ताटकळत थांबल्या, पण कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करूनच गेल्या...

Last Updated:

व्यस्त दौरा आणि धावपळ आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यात असतानाही प्रियांका गांधी दिलेला शब्द विसरल्या नाहीयेत,याचे आता कौतुक होते आहे.

प्रियांका गांधींनी कार्यकर्त्याची इच्छा पुर्ण केली
प्रियांका गांधींनी कार्यकर्त्याची इच्छा पुर्ण केली
हरीष दिमोटे, शिर्डी/ अहिल्यानगर : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी शनिवारी शिर्डी दोऱ्यावर होत्या. या शिर्डीत दौऱ्यात असताना त्यांची सभा पार पडल्यानंतर त्या निघून गेल्या होत्या. या दरम्यान त्यांच्या बाजूला दिवसभर कार्यकर्त्यांचा गराडा होता. मात्र या कार्यकर्त्यांच्या गराड्यातही त्या एका कार्यकर्त्याला दिलेला शब्द त्या विसरल्या नाहीत. अगदी प्रवासाच्या शेवटच्या क्षणी त्या कार्यकर्त्यासाठी विमानतळावर थांबल्या आणि त्याची इच्छा पुर्ण करूनच गेल्या.
त्याचं झालं असं की, काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांची शनिवारी शिर्डी मतदारसंघात जाहीर सभा पार पडली. प्रियांका गांधी शिर्डी दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीचे सारथ्य करण्यासाठी प्रकाश खांबकर या तरुणाची गाडी बुक करण्यात आली होती. त्यामुळे शिर्डी विमान तळापासून साई मंदिर, सभा स्थळ आणि शिर्डी विमानतळ असा प्रवास प्रियांका गांधी यांनी प्रकाश यांच्या गाडीतूनच केला.
advertisement
देशातील एका मोठ्या नेत्या आणि गांधी परिवारातील एक व्यक्ती आपल्या गाडीत बसल्याने प्रकाश देखील भारावून गेला होता. त्यामुळे प्रवासादरम्यान त्याने प्रियांका गांधी यांच्याकडे फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र प्रियांका परतीच्या प्रवासासाठी शिर्डी विमानतळावर पोहचताच स्थानिक कार्यकर्त्यांनी भेटीसाठी त्यांना गराडा घातला होता.
या सगळ्या गोंधळात देखील प्रियांका गांधी प्रकाशला विसरल्या नाही आणि काही वेळ त्याच्यासाठी ताटकळत विमान तळावर ताटकळत थांबल्या. आणि नंतर त्यांनी कहा गया वो...अशी विचारणा केली. त्यानंतर दूर उभ्या असलेल्या प्रकाश खांबकर याला बोलावून घेतले आणि सोबत फोटो काढण्याची त्याची इच्छा पुर्ण केली. दरम्यान व्यस्त दौरा आणि धावपळ आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यात असतानाही प्रियांका गांधी दिलेला शब्द विसरल्या नाहीयेत,याचे आता कौतुक होते आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
प्रियांका गांधींनी दिलेला शब्द पाळला, विमानतळावर ताटकळत थांबल्या, पण कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करूनच गेल्या...
Next Article
advertisement
BMC Mayor Election: महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटानं घेतला मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक्का, ठाकरेंना दिलासा?
महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटाचा मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक
  • भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.

  • महापौर निवडीसाठी काठावरचं बहुमत असलेल्या भाजप-शिंदे गटामध्ये सत्ता वाटपावर चर्चा

  • सत्ता संघर्षाच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाने महत्त्वाचा निर्णय घेतला

View All
advertisement