advertisement

झेंड्याला सॅल्युट केलं अन् फोटो काढताना काळाने झडप घातली, पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू, VIDEO

Last Updated:

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी त्यांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण पोलीस दलामध्ये  हळहळ व्यक्त होत आहे.

News18
News18
धाराशिव : राज्यभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. ठिकठिकाणी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडलं. पण, धाराशिवमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सुरू असताना अधिकाऱ्याला ह्रदयविकाराचा धक्क्याने मृत्यू झाला. परेड सुरू असतानाच ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तलमोड इथं दारूबंदी अबकारी अधिकारी मोहन जाधव यांचा झेंडा वंदन करताना हृदयविकाराच्या तीव्र धक्याने मृत्यू झाला. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीचा कार्यक्रम सुरू असताना त्यांना अचानक ह्रदयविकाराचा अटॅक आला आणि जागेवर कोसळले.
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण सोहळा पार पडला होता. त्यानंतर सगळे अधिकारी आणि कर्मचारी हे फोटो काढण्यासाठी रांगेत उभे होते. मोहन जाधव सुद्धा याच रांगेत उभे होते. पण, अचानक मोहन जाधव कोसळले. मोहन जाधव अचानक कोसळल्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यांच्या जवळ उभ्या असलेल्या सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना उचललं आणि रुग्णालयात दाखल केलं. पण, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.
advertisement
उमरगा तालुक्यातील तलमोड सीमा तपासणी नाक्यावर मोहन जाधव हे कार्यरत होते. ते मुळचे सोलापूर येथील रहिवासी होते. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी त्यांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण पोलीस दलामध्ये  हळहळ व्यक्त होत आहे. मोहन जाधव यांच्या ज्या क्षणी ह्रदयविकाराचा अटॅक आला होता, हा क्षण कॅमेरात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
झेंड्याला सॅल्युट केलं अन् फोटो काढताना काळाने झडप घातली, पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू, VIDEO
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement