पोरींचे फोटो दाखवून ग्राहकांना ओढायचे जाळ्यात अन्..., ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये हाय प्रोफाइल देहविक्री रॅकेट
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाईल देहविक्री रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन दलालांना अटक केली असून पाच तरुणींची सुटका केली आहे. संबंधित दोन आरोपी सेक्स रॅकेटमध्ये गुंतलेल्या तरुणींचे फोटो दाखवून ग्राहक शोधून आणायचे.
पण याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांना मिळाल्यानंतर, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून हे हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस आणलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा अधिक तपास केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वागळे इस्टेट परिसरातील धीरज लॉज परिसरात दोन लोक काही तरुणींचे फोटो दाखवून ग्राहक शोध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचं पथक तयार करण्यात आलं. या पथकाने एक बनावट ग्राहक पाठवून माहितीची शाहनिशा केली.
advertisement
संबंधित लॉजमध्ये अशाप्रकारे सेक्स रॅकेट सुरू असल्याचं खात्री पटताच पोलिसांनी तातडीने धीरज लॉजवर धाड टाकली. यावेळी पोलिसांनी दोन दलालांसह पाच तरुणींना रंगेहाथ पकडलं. छापेमारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून तरुणींची सुटका केली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. लोक वस्ती असलेल्या अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी अशाप्रकारे सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
December 06, 2025 11:11 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पोरींचे फोटो दाखवून ग्राहकांना ओढायचे जाळ्यात अन्..., ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये हाय प्रोफाइल देहविक्री रॅकेट


