पुणे बेंगलोर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, ८ ते १० किमीपर्यंत रांगा, गणेशभक्तांचा संताप

Last Updated:

Pune Bangalore Highway Traffic Jam: वाहतूक कोंडीमुळे कराडपासून कोल्हापूरकडे आणि पुण्याच्या दिशेला जवळपास आठ ते दहा किलोमीटर लांब रांगा आहेत.

पुणे बेंगलोर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
पुणे बेंगलोर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
कराड, सातारा: पुणे बेंगलोर महामार्गावर कराड शहरापासून तासवडे टोल नाक्यापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. गेल्या तीन तासापासून गावी जाणारे चाकरमानी वैतागले आहेत. गणपती सणासाठी गावी जाताना वाहतूक कोंडीने भक्त प्रचंड वैतागले आहेत. विशेष याच मार्गावरून पुढच्या काही वेळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रवास करणार आहेत.
चाकरमानी गणेशभक्त मुंबई-पुण्याहून आपापल्या गावाकडे निघाले आहेत. मात्र प्रचंड वाहतूक कोंडीमुळे गेल्या ३ तासांपासून ते अडकून पडले आहेत. वाहतूक कोंडीमुळे कराडपासून कोल्हापूरकडे आणि पुण्याच्या दिशेला जवळपास आठ ते दहा किलोमीटर लांब रांगा आहेत.
पुणे आणि कोल्हापूरच्या दोन्ही दिशेला ट्रॅफिक जाम झाल्याने वाहन चालक वैतागले आहेत. अनेकांनी शहरात पर्याय रस्त्याला गाड्या घातल्याने शहरातही वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे. सलग सुट्ट्यांमुळे गावाकडे जाणारे चाकरमानी वाहतूक कोंडीत अडकले. वाहतुकीची कोंडी फोडताना कराड शहर वाहतूक पोलिसांची अक्षरश: दमछाक झाली आहे.
advertisement
सातारा दहीवडीच्या दौऱ्यावर असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याच महामार्गावरून प्रवास करणार आहेत. अजित पवार कोल्हापूरमध्ये आज मुक्कामी असतील. त्यांनाही वाहतूक कोंडीचा सामना करायला लागण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुणे बेंगलोर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, ८ ते १० किमीपर्यंत रांगा, गणेशभक्तांचा संताप
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement