कट मारण्याचा नाद नडला! दोन एसटी समोरासमोर धडकल्या, पुण्याजवळ अपघात

Last Updated:

कडुस-कोहिंडे रोडवर दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, सुदैवाने जीवितहानी टळली. प्रवाशांनी एसटी चालकांच्या कट मारण्यावर संताप व्यक्त केला आणि कारवाईची मागणी केली.

News18
News18
प्रतिनिधी पुणे, सचिन तोडकर: गावा-गावात आजही एसटी जाते, त्यामुळे खूप लहान गाव असेल तरी तिथे एखादी एसटी जातेच जाते, त्यामुळे लोकांना गावातून जाणं येणं अधिक सोयीचं पडतं. मात्र एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारी एक धक्कादायक बाजू समोर आली आहे. एसटी चालक कट मारत असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आहे. वारंवार कट मारण्याच्या नादात दोन एसटी समोरासमोर आल्या आणि नको ते भयंकर घडलं.
पुण्याच्या खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यावर एसटी बस प्रवाशांसाठी आता धोक्याचा विषय बनत चाललाय. कडुस-कोहिंडे रोडवर दोन एसटी बसचा समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत सुदैवानं कोणीही गंभीर जखमी झाला नाही, मात्र प्रवाशांना डोळ्यासमोर थरारक क्षण अनुभवावा लागला. डोळ्यासमोर मृत्यू काय असतो तो अनुभवला. दैव बलवत्तर त्यामुळे या दुर्घटनेत फार कोणाला काही लागलं नाही.
advertisement
स्थानिकांनी सांगितले की, ही दोन्ही बस भरधाव होत्या. कट मारण्याच्या नादात होते आणि त्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली. मात्र एका चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. त्यांनी बस बाजूला करून वेळेत परिस्थिती नियंत्रणात आणली, ज्यामुळे जीवितहानी टळली. प्रवाशांनी सांगितले की, अचानक दोन बस एकमेकांसमोर येत असताना थरारक अनुभव आला.
विद्यार्थी आणि ग्रामीण प्रवासी विशेषतः या घटनेने घाबरले असल्याचे त्यांनी व्यक्त केले. बसमधून धावताना अचानक समोर दुसरी बस आली आणि आम्ही सगळे घाबरले, अशी प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी दिली. त्यांच्यानुसार, ग्रामीण भागातील रस्त्यावर प्रवास करताना या प्रकारची घटना दररोज घडत असल्यासारखी वाटते.
advertisement
प्रवाशांनी अपघाताचा थरार डोळ्यासमोर अनुभवल्याने आता एसटी बसचा प्रवासही सुखरुप नसल्याची भावना व्यक्त केली आहे. एसटी चालक कट मारण्याच्या नादात प्रवाशांचा जीव धोक्यात घालत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कट मारण्याचा नाद नडला! दोन एसटी समोरासमोर धडकल्या, पुण्याजवळ अपघात
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement