PMC Election: पुण्यात मतदानादरम्यान राडा, एकाच दिवशी दोन दंगलीचे गुन्हे दाखल, कुठे कुठे दंगा झाला?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
पुण्यात प्रभाग क्रमांक ९ मध्ये एका दिवसात दोन दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले. राष्ट्रवादीचे उमेदवार बाबूराव चांदेरे यांच्या सुनेला रात्री मारहाण झाली. बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पुणे : बृहन्मुंबई महापालिकेनंतर पुणे महापालिकेच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुण्यात काँटे की टक्कर होत आहे. प्रचारानंतरही दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड संघर्ष दिसून आला. मतदानाला काही तास बाकी असताना आणि प्रत्यक्ष मतदान सुरू असताना पदाधिकाऱ्यांमध्ये हमरातुमरी झाल्याने एका दिवसात दोन दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले.
पुण्यात प्रभाग क्रमांक ९ मध्ये एका दिवसात दोन दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले. राष्ट्रवादीचे उमेदवार बाबूराव चांदेरे यांच्या सुनेला रात्री मारहाण झाली. बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरूवारी दुपारी प्रमोद निम्हण यांच्या कार्यकर्त्यांनी चांदेरे यांना बोगस मतदार आणल्याचा आरोप करत गाडी फोडल्याने दुसरा दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
advertisement
पुण्यात पैसे वाटपावरून राडा
पुण्यात प्रभाग क्रमांक ३३ मध्ये धायरी गावात तणावाचे वातावरण होते. पैसे वाटपावरून राडा झालेला पाहायला मिळाला. किशोर पोकळे आणि राहुल पाकळेंमध्ये मारहाण झाली. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
प्रभाग क्रमांक 25 ड मध्ये राष्ट्रवादीचे बटण दाबल्यानंतर मतदान होत नसल्याचा आरोप करण्यात आला. उमेदवाराने आक्षेप घेतल्यानंतर गोंधळ झालेला पाहायला मिळाला. दुसरीकडे राष्ट्रवादीचे बटण दाबल्यानंतर भाजपाला मतदान होत असल्याचा आरोप झाला. शिवाजी मराठा हायस्कूल मधला हा प्रकार आहे.
advertisement
पुण्यात दुपारी ३:३० पर्यंत ४० टक्के मतदान झाले
पुण्यात दुपारी ३:३० पर्यंत ४० टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदानात उल्लेखनीय वाढ झाली. पुण्यात तरुण तरुणींसह, महिलांचाही मतदानाला मोठा प्रतिसाद मिळाला. दुपारपर्यंत मतदानाला अल्प प्रतिसाद होता, दुपारनंतर मतदानाला गती आली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 5:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
PMC Election: पुण्यात मतदानादरम्यान राडा, एकाच दिवशी दोन दंगलीचे गुन्हे दाखल, कुठे कुठे दंगा झाला?










