Pune : 'कोल्हापुरात मला परिणाम भोगावे लागले...', शिवजयंतीच्या राड्यावरून चंद्रकांत पाटील भडकले, म्हणाले 'चल फूट...'

Last Updated:

Chandrakant patil On Dolby banned : पुण्यातील एका कार्यक्रमात शिवजयंतीला डॉल्बी कशाला हव्यात, डॉल्बीमुक्ती उत्सव साजरे केले पाहिजे, असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

Pune News Chandrakant patil
Pune News Chandrakant patil
Chandrakant patil strongly support Dolby banned : न भुतो न भविष्यती अशी गणरायाची मिरवणूक कोल्हापूरमध्ये 2017 मध्ये पार पडली होती. गणेशोत्सवात कोल्हापूरकरांनी डॉल्बीमुक्तीचा ध्यास घेतला होता. कोल्हापूरचे तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी जे डॉल्बी लावतील त्यांना कायद्याचा धाक दाखवला होता. अशातच आता पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निम्मित झालेल्या राड्यावरून चंद्रकांत पाटील भडकले. शिवजयंतीला डॉल्बी कशाला हव्यात? डॉल्बीमुक्ती उत्सव साजरे केले पाहिजे, असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

कोल्हापुरात मला परिणाम भोगावे लागले - चंद्रकांत पाटील

मी कोल्हापूरचा पालकमंत्री होतो, तेव्हा मी डॉल्बीवर बंदी आणली. एकमेव जिल्हा होता, तिथं बंदी होती. मला त्याचे परिणाम भोगावे लागले. गणेशोत्सवात डॉल्बीवर बंदी घातल्याने लोकांनी आमच्या स्टॉलवर मुलांना पाठवणं थांबवलं. पण मला सपोर्ट करणारे लोकं देखील वाढले. अनेक गणेशोत्सवांनी पाठिंबा दिला तर अनेकांनी विरोध केला. तुम्हाला वाजवायचंच आहे ना, मग नाशिक ढोल वाजवा, दिल्लीवरून ढोल आणा. पण मी डॉल्बीला विरोध केला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
advertisement

व्यसन तिथूनच सुरू होतं - चंद्रकांत पाटील

कोथरूडमध्ये डॉल्बी बंद करायचा आहे, कारण व्यसन तिथूनच सुरू होतं, डॉल्बी वाजल्यावर अंगात संचारलं जातं, डॉल्बी वाजताना नाचताना थोडं घ्याव लागतं. काही झालं की दारू, काही झालं की डॉल्बी. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी काय चाललं होतं? संभाजी महाराजांचा छावा बघितला आणि आपण इथे काय करतोय? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केलाय.
advertisement

मी म्हणेल चल फूट... - चंद्रकांत पाटील

दरम्यान, मी फकीर माणूस आहे. अनेकजण म्हणाली लोक मतं देणार नाहीत. पण तुमच्या सारख्या लोकांच्या आशीर्वादामुळे इथे आलो, आता म्हणतील डॉल्बीला परवानगी देणार नाही तुम्हाला मत देणार नाही मी म्हणेल चल फूट... मी माझं मत सोडणार नाही. मला आणि माझ्या पक्षाला अशा लोकांची मतं मिळाली नाही तरी चालतील. आमचं काम घराघरात पोहोचलं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune : 'कोल्हापुरात मला परिणाम भोगावे लागले...', शिवजयंतीच्या राड्यावरून चंद्रकांत पाटील भडकले, म्हणाले 'चल फूट...'
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement