BJP Clash: उमेदवारी नाकारली, नाराजीचा उद्रेक, संभाजीनगरात भाजप कार्यालयात राडा, थेट पोलिसांना बोलावलं, Video
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
BJP Clash: महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने आता राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांच्या नाराजी स्फोट होऊ लागला आहे.
छत्रपती संभाजीनगर: महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने आता राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांच्या नाराजी स्फोट होऊ लागला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यालयात मोठा राडा झाला आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्याने नाराज कार्यकर्ते, पदाधिकारी आक्रमक झाले. राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयात नाराजांनी धडक दिली. एका इच्छुक महिला उमेदवाराने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यास काही तासांचा अवधी राहिला आहे. बंडखोरीच्या धास्तीने भाजपसह इतर राजकीय पक्षांनी यादी जाहीर केली नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदे गटाची युती तुटल्यानंतर एबी फॉर्मचे वाटप सुरू झाले.
आम्ही रक्ताचे पाणी केले आणि पक्षाचे काम केले. मात्र, इतरांना सहज उमेदवारी कशी काय दिली, असा संतप्त सवाल इच्छुकांनी केला. दिव्या मराठे या तरुणीने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयात हा सगळा राडा झाला. पक्षासाठी काम केलं पण बाहेरुन आलेल्या लोकांनी उमेदवारी मिळवली असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला.
advertisement
परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप केला. आक्रमक झालेल्या नाराजांना पोलिसांनी अटकाव केला. पोलिसांनी नाराज उमेदवारांना ताब्यात घेतल्याचे समोर आले.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 1:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP Clash: उमेदवारी नाकारली, नाराजीचा उद्रेक, संभाजीनगरात भाजप कार्यालयात राडा, थेट पोलिसांना बोलावलं, Video








