Kalyan News : भाजपने ज्या काँग्रेस नेत्याला साडी नेसवली, त्यालाच राहुल गांधींचा फोन, नेमकी काय चर्चा झाली?

Last Updated:

डोंबिवलीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मामा पगारे यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यात गाठून त्यांना भरजरी शालू नेसवली होती. या संदर्भातला व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर आता मामा पगारे यांना राहुल गांघी यांना फोन केला आहे.

rahul gandhi phone call mama pagare
rahul gandhi phone call mama pagare
Kalyan News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साडीच्या वेशातील प्रतिमा सोशल मीडियावर प्रसारीत केल्यामुळे डोंबिवलीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मामा पगारे यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यात गाठून त्यांना भरजरी शालू नेसवली होती. या संदर्भातला व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर मामा पगारे हे पोलीस स्टेशनला जात असताना त्यांची प्रकृती खालवली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या सगळ्या घडामोडीनंतर आता त्यांना आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोन आला होता. या दरम्यान राहुल गांधी यांची पगारे यांच्याची काय चर्चा झाली?याचा तपशील समोर आला आहे.
खरं तर मामा पगारे यांच्यासोबत झालेल्या य़ा घटनेनंतर ते पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यास जात होते.मात्र त्याचवेळी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सूरू आहेत.तसेच या घटनेची माहिती काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मिळताच त्यांनी तत्काळ मामा पगारे यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी राहुल गांधी यांनी 'मामा तुम्ही घाबरु नका,काँग्रेस तुमच्या सोबत आहे'.आम्हाला तुमच्या बद्दल बाळासाहेब थोरातांनी माहिती दिली आहे.50 वर्षापासून तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात. तुमचा खूप आदर आहे,असा शब्द दिला आहे.त्यामुळे मामा पगारे यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते.
advertisement
राहुल गांधी यांनी केलेल्या फोनवर बोलताना मामा पगारे म्हणाले की, जेव्हा हा प्रकार झाला तेव्हा मी सर्वांत आधी कॉल बाळासाहेब थोरात यांना केला.कारण बाळासाहेब थोरात यांना राहुल गांधी यांच्या कुटुंबातील व्यक्ती म्हणून ओळखले जातात.त्यामुळे बाळासाहेबांनी ताबडतोब ही घटना सांगितली. मामा पगारे हे गेल्या 50 वर्षापासून निष्ठेने माझ्यासोबत काम करत आहेत.निस्वार्थपणे त्यांच डोंबिवलीमध्ये काम आहे.त्यांनी आंतरराष्ट्रीय पुरस्कार घेतला आहे. आणि त्यांच्यावरती हा प्रकार ओढवला आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी बाळासाहेब थोरात यांना माझ्याशी बोलण करून देण्यास सांगितले,असे मामा पगारे यांनी सांगितले.
advertisement
मामा पगारे पुढे म्हणाले, राहुल गांधी मला बोलले, मामा घाबरू नका.संपूर्ण काँग्रेस पार्टी तुमच्यासोबत आहे. अन्यायाविरूद्ध तुम्ही लढत राहा. मी तुमच्यासोबत आहे,असे मला त्यांनी आश्वासन दिले.त्यामुळे आता माझ्या मनाला पुर्ण शास्वती आहे. मुंबईमध्ये दौरा होईल तेव्हा राहुल गांधी माझी विचारणा करतील एवढं मी निश्चित सांगतो,असा विश्वास मामा पगारे यांनी व्यक्त केला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kalyan News : भाजपने ज्या काँग्रेस नेत्याला साडी नेसवली, त्यालाच राहुल गांधींचा फोन, नेमकी काय चर्चा झाली?
Next Article
advertisement
Eknath Shinde : ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाला दिलं आमंत्रण?
ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाल
  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

View All
advertisement