Rahul Gandhi : महाराष्ट्रात 5 वर्षात 44 लाख मतदार वाढले मग 5 महिन्यात 39 लाख मतदार कसे आले? राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला सवाल

Last Updated:

Rahul Gandhi on Election Commision : महाराष्ट्राच्या निवडणुकांचा आम्ही अभ्यास केला. या निवडणुकांमध्ये आम्हाला अनियमितता आढळली आहे. कारण महाराष्ट्रात 5 वर्षात 44 लाख मतदार वाढले मग 5 महिन्यात 39 लाख मतदार कसे आले? असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणुक आयोगाला केला आहे.

Rahul Gandhi on Election Commision : महाराष्ट्राच्या निवडणुकांचा आम्ही अभ्यास केला. या निवडणुकांमध्ये आम्हाला अनियमितता आढळली आहे. कारण महाराष्ट्रात 5 वर्षात 44 लाख मतदार वाढले मग 5 महिन्यात 39 लाख मतदार कसे आले? असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणुक आयोगाला केला आहे.यासह आम्हाला लोकसभा आणि विधाससभा निवडणुकीच्या मतदारांची यादी हवीय. नाव, पत्ता आणि फोटोसहीत यादी द्यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला केली आहे.
राहुल गांधी यांची दिल्लीत पत्रकार परिषद पार पडली आहे.या पत्रकार परिषदेला शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात पार पडलेल्या निवडणूकीवर भाष्य केले. 2019 आणि 2024 या पाच वर्षाच्या काळात आम्हाला 44 लाख मतदार महाराष्ट्रात वाढले. त्यानंतर लोकसभेची 2024 ची निवडणूक आणि विधानसभेची 2024 निवडणूक या काळात आम्हाला 39 लाख नवीन मतदार वाढले. हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येएवढे मतदार वाढले? त्यामुळे हे मतदार कोण आहेत? असा सवाल राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला केला आहे.
advertisement
राहुल गांधी पुढे म्हणाले, आम्हाला लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीची मतदारांची यादी हवीय. नाव, पत्ता आणि फोटोसहीत यादी हवीय. आम्ही याआधी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. पण त्यांनी काहीच उत्तर दिलेले नाही. त्यामुळे काही तरी चुकत असल्याने निवडणुक आयोग आम्हाला उत्तर देत नाही आहे,असा आरोप राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केला.
advertisement

राहुल गांधीचे तीन सवाल 

हिमाचलच्या लोकसंख्येएवढे 39 लाख मतदार कोण आहेत? आणि कुठून आले?
महाराष्ट्रातील युवांची सख्या 9.7 करोड मतदार आहेत, म्हणजे लोकसंख्येपेक्षा जास्त मतदान आहे?
काँग्रेसला लोकसभेला कामठी विधानसभा मतदार संघात 1.36 ला मतं मिळाली आहेत, त्यामुळे लोकसभा आम्ही जिंकलो. भाजपला या निवडणुकीत 1.19 लाख मतं मिळाली. पण या मतदार संघात 35 हजार नवीन मतदार येतात. 35 हजार मतं भाजपला मिळतात आणि ते जिंकतात. हे एक उदाहरण आहे आणि भाजप निवडणुक जिंकते. अशा घटना शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या मतदार संघात घडल्या आहेत,असे देखील राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचे लक्ष्य केंद्रीत केले आहे.
advertisement
निवडणूक आयोग सरकारची गुलामगिरी करत आहे, ही 39 लाख मते कुठे जाणार? आता ते बिहारमध्ये जातील, नंतर यूपीत जातील, हा नवा पॅटर्न झाला आहे, आम्ही लढणारे लोक आहोत, आम्हीच लढणार आहोत, आमचा कसा पराभव झाला हे आम्ही पुढे आणले आहे, निवडणूक आयोगाने घातलेले कफन काढून टाकावे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rahul Gandhi : महाराष्ट्रात 5 वर्षात 44 लाख मतदार वाढले मग 5 महिन्यात 39 लाख मतदार कसे आले? राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला सवाल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement