दहावी उत्तीर्ण तरूणांना रेल्वेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी! 1104 पदांसाठी भरती; सविस्तर माहिती बातमीमध्ये
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Railway Apprentice Recruitment 2025: रेल्वे भरती सेलने गोरखपूर विभागात (गोरखपूर, इज्जतनगर, लखनऊ, गोंडा आणि वाराणसी) अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या विभागामध्ये वेगवेगळ्या ट्रेडसाठी तब्बल 1104 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि रेल्वेत काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती सेलने गोरखपूर विभागात (गोरखपूर, इज्जतनगर, लखनऊ, गोंडा आणि वाराणसी) अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या विभागामध्ये वेगवेगळ्या ट्रेडसाठी तब्बल 1104 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. भरती करण्यात आलेल्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांना त्वरित अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या अप्रेंटिसशिप करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
ner.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्जदार आपला अर्ज भरू शकणार आहेत. कोणकोणत्या रिक्त पदांसाठी किती जागांसाठी ही नोकरभरती केली जाणार आहे, जाणून घ्या
- मेकॅनिकल वर्कशॉप/गोरखपूर- 390
- सिग्नल फॅक्टरी/गोरखपूर कॅन्ट- 63
- ब्रिज फॅक्टरी/गोरखपूर कॅन्ट- 35
- मेकॅनिकल वर्कशॉप/इज्जतनगर- 142
- डिझेल शेड/इज्जतनगर- 60
- कॅरेज आणि वॅगन/इज्जतनगर- 64
- कॅरेज आणि वॅगन/लखनऊ जंक्शन- 149
- डिझेल शेड/गोंडा- 88
- कॅरेज आणि वॅगन/वाराणसी- 73
- टीआरडी/वाराणसी- 40
advertisement
अशा एकूण 1104 पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे.
रेल्वेतील या अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. उमेदवार मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी आणि बारावी उत्तीर्ण असावा. यासोबतच संबंधित ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. अर्जदारांचे वय 15 ते 24 वर्षांदरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. इतर मागासवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्षांची वयोमर्यादा, अनुसूचित जाती आणि जमातीतील उमेदवारांना 5 वर्षांची वयोमर्यादा आणि अपंग व्यक्तींसाठी 10 वर्षांची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
advertisement
https://apprentice.rrcner.net/next_page.php या लिंकवर जाऊन अर्जदार अर्ज करू शकणार आहेत. या बातमीमध्ये अर्जदाराला अर्जाची लिंक सुद्घा देण्यात आली आहे. अर्जाची आणि अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख एकच आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदावारांना आणि सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क 100 रूपये भरावा लागणार आहे आणि महिला, दिव्यांग आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. उमेदवारांची निवड प्रामुख्याने दहावी आणि आयटीआयमधील मिळालेल्या गुणांच्या आधारावर तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार केली जाईल. गुणवत्ता यादीनंतर निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर त्यांना नियुक्ती दिली जाईल.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
October 21, 2025 3:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दहावी उत्तीर्ण तरूणांना रेल्वेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी! 1104 पदांसाठी भरती; सविस्तर माहिती बातमीमध्ये