Pen Railway Station: पेणकरांना बाप्पा पावला! दिवा-सावंतवाडी ट्रेनला मिळाला पेणमध्ये थांबा
- Published by:Vrushali Kedar
 - local18
 
Last Updated:
Pen Railway Station: कोरोना काळात पेण येथील थांबा बंद करण्यात आला होता.
पेण : रायगड जिल्ह्यातील पेण हे शहर जगप्रसिद्ध आहे. याठिकाणच्या सुबक गणेशमूर्तींना सातामुद्रापार मागणी असते. अशा या शहरातील रेल्वेप्रवाशांची मात्र गेल्या काही वर्षांपासून प्रचंड गैरसोय होत होती. आता गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच रेल्वे मंत्रालयाने पेणकरांना एक मोठी भेट दिली आहे. कोरोना महामारीत दिवा-सावंतवाडी या ट्रेनचा पेणमधील थांबा बंद करण्यात आला होता. हा थांबा आता पुन्हा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता पेणमधील रेल्वे प्रवाशांची गैरसोय ठळणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिवा-सावंतवाडी रेल्वेगाडीला पेण स्टेशनवर पुन्हा थांबा देण्यात आला आहे. या रेल्वेला पूर्ववत थांबा दिला जावा, अशी मागणी पेणमधीलन नागरिक करत होते. खासदार धैर्यशील पाटील यांनीही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमवेत बैठक घेऊन हीच मागणी केली होती. या मागणीला यश आलं असून रेल्वे मंत्रालयाने दिवा-सावंतवाडी ट्रेनसाठी पेण थांबा जाहीर केला आहे.
advertisement
रायगड जिल्ह्यातील पेण शहरात मोठं रेल्वे स्टेशन आहे. मात्र, याठिकाणी काही रेल्वे थांबत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. पेणच्या उत्तरेकडे कासू हे रेल्वे स्टेशन आहे तर दक्षिणेकडे हमरापूर हे स्टेशन आहे. याठिकाणी देखील काही रेल्वे गाड्या थांबत नाहीत. म्हणून दिवा-सावंतवाडी गाडीला पेण येथे थांबा देण्याची मागणी केली जात होती. या रेल्वेला यापूर्वी पेण येथे थांबा होता. मात्र, कोरोना काळात पेण येथील थांबा बंद करण्यात आला होता.
advertisement
पेण रेल्वे स्टेशन हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पनवेल-रोहा मार्गावर आहे. या स्टेशनवरून पेण-दिवा मेमू ट्रेन सुटते. त्यामुळे पेण ते मुंबई आणि इतर भागांमध्ये प्रवास करणं सोपं होतं. पण, प्रवाशांची संख्या बघता ही गाडी पुरेशी ठरत नाही. म्हणून पेणमधील नागरिक दिवा-सावंतवाडी गाडीच्या थांब्याची मागणी करत होते.
view commentsLocation :
Raigad,Maharashtra
First Published :
September 02, 2025 11:17 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pen Railway Station: पेणकरांना बाप्पा पावला! दिवा-सावंतवाडी ट्रेनला मिळाला पेणमध्ये थांबा


