Raj Thackeray : निवडणूक आयोगावर टीका करताना राज ठाकरेंचा पंच, उद्धव यांच्यासह सगळेच खळखळून हसले! पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Raj Thackeray laughter In Press Conference : आज आम्ही राज्य आणि केंद्रिय आयोगाच्या प्रतिनिधींना भेटलो. निवडणूक आयोग मतदार याद्या दाखवत नसेल तर हा पहिला घोळ इथंच आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
MVA allegation On Election Commission : महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयुक्तांची आणि आज राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. यानंतर महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद (Raj Thackeray Press Conference) घेतली. महाविकास आघाडीच्या मंचावरून बोलताना राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. त्यावेळा राज ठाकरेंनी एक पंच मारला अन् उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वजण खळखळून हसले.
काय म्हणाले राज ठाकरे?
आज आम्ही राज्य आणि केंद्रिय आयोगाच्या प्रतिनिधींना भेटलो. निवडणूक आयोग मतदार याद्या दाखवत नसेल तर हा पहिला घोळ इथंच आहे, असं राज ठाकरे म्हणाले. मला अत्यंत महत्वाची गोष्ट तुमच्या पुढं ठेवायची आहे. निवडणूक आली की निवडणूक आयोग आला आणि मतदार आले. राजकिय पक्ष निवडणूक लढवतो. तुम्ही तर राजकिय पक्षांना याद्याच दाखवणार नसाल तर घोळ असणारच, असंही राज ठाकरे म्हणाले.
advertisement
राज ठाकरे यांनी पंच मारला
मी तुम्हाला दोन याद्या दाखवतो. 2014 च्या निवडणूक झाली. ती यादी मी दाखवतो. 2024 ला यादी जाहीर केली तेव्हा फक्त नावं आहे फोटो नाही पत्ता नाही. "मतदारसंघ 124 - चारकोप, नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, मुलाचं नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124... वडिलांचं नाव श्रीनाथ चव्हाण वय वर्ष 43... म्हणजे कुणी कुणाला काढलंय? हेच समजत नाही", असं म्हणत राज ठाकरे यांनी पंच मारला. त्यानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. त्यानंतर त्यांनी गंभीर विषय आहे, असं म्हणत सर्वांना गप्प करण्याचा प्रयत्न देखील केला.
advertisement
जयंत पाटील यांची निवडणूक आयोगावर टीका
दरम्यान, जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. आम्ही काल मुख्य निवडणूक अधिकारी यांना भेटून आम्ही त्यांना मतदार यांद्यांमधल्या अनंत चुका दाखविल्या. याद्या दुरूस्त करण्यासाठी आम्ही सुरूवात करू असं आश्वासन देखील दिल्याचं निवडणूक आयोगाने दिल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. काही मुद्दे हे राज्य निवडणूक आयोगाकडे येत होते म्हणून आज सामुहीकरित्या त्यांच्या पुढे आलो. आम्ही त्यांना पुरावे दिले. अपुरे पत्ते, चुकीचे पत्ते, मतदार यादीत ज्यांचे नाव आहे ते तिथे राहत नाही, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2025 2:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray : निवडणूक आयोगावर टीका करताना राज ठाकरेंचा पंच, उद्धव यांच्यासह सगळेच खळखळून हसले! पाहा Video