Shiv Sena UBT MNS: महापालिका निवडणुकीआधी मोठी राजकीय घडामोड, मनसेचे उमेदवार ठाकरेंच्या ‘मशाल’वर लढणार

Last Updated:

Shiv Sena UBT MNS : आगामी मुंबई महापालिका आणि अन्य महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची चर्चा सुरू आहे. या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपांची चर्चा सुरू असताना दुसरीकडे आता मोठी घडामोड घडली आहे.

महापालिका निवडणुकीआधी मोठी राजकीय घडामोड, मनसेचे उमेदवार ठाकरेंच्या ‘मशाल’वर लढणार
महापालिका निवडणुकीआधी मोठी राजकीय घडामोड, मनसेचे उमेदवार ठाकरेंच्या ‘मशाल’वर लढणार
मुंबई: आगामी मुंबई महापालिका आणि अन्य महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची चर्चा सुरू आहे. या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपांची चर्चा सुरू असताना दुसरीकडे आता मोठी घडामोड घडली आहे. ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये युती आधीच मनोमिलन होत असल्याचे दिसून आले. आता, मनसेचे उमेदवार थेट शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावरच निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत.
राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. मुदत संपण्याच्या अवघ्या काही तास आधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथमधील कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आदेश देत अधिकृतपणे निवडणूक लढवण्यास मनाई केली होती. मनसेची अधिकृत उमेदवारी कोणालाही दिली जाणार नाही. इच्छुकांनी अपक्ष म्हणून लढायचे किंवा आपापल्या राजकीय गणितांनुसार निर्णय घ्यायचा, अशी मुभा देण्यात आली होती. त्यानंतर अंबरनाथमध्ये मोठी अनपेक्षित घडामोड घडली.
advertisement

मनसेचे उमेदवार ठाकरेंच्या निवडणूक चिन्हावर...

अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या मनसैनिकांनी शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मनसेचे 14 उमेदवार आता मशाल चिन्हावर निवडणूक लढणार असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रत्येक पॅनलमध्ये मनसेचा एक उमेदवार आणि ठाकरे गटाचा एक उमेदवार असणार आहे.

अंबरनाथमध्ये काँग्रेसला वगळून आघाडी...

advertisement
शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असे तीन पक्ष एकत्र आले असून अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षाकरिता अंजली राऊत यांना उमेदवारी दिली आहे. अंजली राऊत यांनी आज उमेदवारी दाखल केला आहे. तर, काँग्रेसने या आघाडीतून बाहेर पडत स्वतंत्र पॅनेल, नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार आहेत.

बदलापूरमध्ये तृतीयपंथी रिंगणात...

बदलापूरमध्ये एका तृतीयपंथीयाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रोशनी सोनकांबळे असे त्यांचे नाव असून प्रभाग १० मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपण निवडून आल्यावर कामे केले नाही तर तोंडाला काळं फासा असे आव्हानच त्यांनी दिले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shiv Sena UBT MNS: महापालिका निवडणुकीआधी मोठी राजकीय घडामोड, मनसेचे उमेदवार ठाकरेंच्या ‘मशाल’वर लढणार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement