Raj Thackeray: आज बाळासाहेब नाहीत तेच बरं झालं...भर सभेत राज ठाकरे असं का म्हणाले?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्याच्या घटनेवर 20 वर्षांनी पहिल्यांदाच भाष्य केलंय.
मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे याचं एक वेगळं नातं राहिलं आहे. अगदी लहानपणापासून बाळासाहेबांच्या सावलीत राज ठाकरे वाढले. त्या सगळ्या जुन्या आठवणींना राज ठाकरेंनी उजाळा दिलाय.तब्बल तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरेंनी सामनात लेख लिहिला आणि त्यानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच शिवसेना सोडण्यावर भाष्य केलं आहे. सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता आज बाळासाहेब नाहीत तेच बरं झालं, असे म्हणत ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी उद्धव ठाकरेंही उपस्थित होते षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे भावूक झाल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी आणि किस्से राज ठाकरे सांगत होते. त्यावेळी भावनिक झालेल्या रश्मी ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू तरळले. तर भाषण पूर्ण झाल्यानंतर राज ठाकरे सभागृहातून निघाले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी रश्मी ठाकरे राज यांच्यासह सभागृहाबाहेर कारपर्यंत आल्या होत्या.
advertisement
भाजपावर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा दाखला देत भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय आहे. सध्या हिंदुत्वाचा बाजार मांडून ठेवल्याचं सांगत भाजपावर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र डागलंय. हिंदुत्वाचा बाजार मांडलेला पाहून बाळासाहेब ठाकरे व्यथित झाले असते असंही राज ठाकरेंनी म्हटलंय.
बाळासाहेब नाहीत ते बरं झालं... : राज ठाकरे
आज देशात आणि महाराष्ट्रात गुलामांचा बाजार निर्माण झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी या गोष्टी घडत आहेत. मुंबईसह कल्याण डोंबिवली आणि इतर ठिकाणचा बाजार पाहून अक्षरशः शिसारी आली. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर मला वाटतंय की बाळासाहेब नाहीत ते बरं झालं. हे सगळं चित्र पाहून बाळासाहेब व्यथित झाले असते, अशा शब्दात राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला.
advertisement
शिवसेना सोडणं हे माझ्यासाठी घर सोडण्यासारखं होतं : राज ठाकरे
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्याच्या घटनेवर पहिल्यांदाच भाष्य केलंय. शिवसेनेतून बाहेर पडलो हे माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं तर घर सोडण्यासारखं होतं असं राज ठाकरेंनी म्हटलंय. गेल्या 20 वर्षांत अनेक गोष्टी मला आणि उद्धवलाही उमजल्यात असंही राज ठाकरे म्हणाले.
advertisement
हे ही वाचा :
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 8:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray: आज बाळासाहेब नाहीत तेच बरं झालं...भर सभेत राज ठाकरे असं का म्हणाले?








