LIVE NOW

Live Updates: मुंबईकडे वाकड्या नजरेनं पाहिल त्याचा राजकारणात खात्मा, उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

Last Updated:

Raj-Uddhav Thackeray alliance Live Update: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज दुपारी 12 वाजता युतीची घोषणा करणार, राज्यात नव्या राजकीय समीकरणाची चर्चा, महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला.

News18
News18
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा मुहूर्त अखेर ठरला.आज दुपारी 12 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र युतीची घोषणा करणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे.. त्यामुळे ज्या क्षणाची दोन्ही ठाकरे बंधूंचे सैनिक वाट पाहात होते तो क्षण आता जवळ आला आहे. आज दुपारी बारा वाजता उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंचे पक्ष राजकीय पटलावर युतीची घोषणा करणार असून, राज्यात नव्या युतीचा उदय होणार आहे. उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत या युतीची घोषणा केली जाणार आहे. या नव्या राजकीय समीकरणावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. खरं तर ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा या पूर्वीचं होणार होती. पण जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सी खेच झाल्याची चर्चा आहे. दुसरीकडे महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील ठरला आहे. राज्यातील राजकीय घडामोडींचे अपडेट झटपट वाचा लाईव्ह अपडेट्स
Dec 24, 202512:42 PM IST

मला कोण काय म्हणतं त्याच्याशी काही घेणं देणं नाही- उद्धव ठाकरे

भाजपला काय हवं ते भाजपने पाहावं, मराठी माणसाला काय हवं ते आम्ही पाहू
शिवसेना आणि मनसेची युती जाहीर केली आहे

 

Dec 24, 202512:40 PM IST

कुठल्याही वादा पेक्षा महाराष्ट्र मोठा यातून एकत्र आलोय - राज ठाकरे

कुठल्याही वादा पेक्षा महाराष्ट्र मोठा यातुन एकत्र आलोय

कोण किती जागा लढवणार हे सांगणार नाही

सध्या राज्यात लहान मुल पळवणारी टोळी सक्रिय
मी उत्तर देवांना द्यावी दानवांना नाही

Dec 24, 202512:39 PM IST

मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार- राज ठाकरे

राज ठाकरेंकडून युतीची घोषणा
मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार- राज ठाकरे

advertisement
Dec 24, 202512:38 PM IST

Live Updates: उद्धव ठाकरे यांनी थेट महायुतीला दिला इशारा

मुंबईसह महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर राजकीय खात्मा करू, ही शपथ आम्ही घेऊन एकत्र आलोय

संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश काय सत्यनारायणाचा कलश म्हणून आणले नाही ठाकरे कुटुंबीय संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी लढत होती

मुंबईचे लचके तोडण्यासाठी मनसुबे रचले जाताय

एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी मुंबईला महाराष्ट्रापासून दुर करणाऱ्याचा खतमा करण्यासाठी आम्ही आलो आहोत

तुटु नका फुटु नका मराठीचा वसा सोडू नका

मराठी माणूस कोणाच्या वाट्याला जात नाही

Dec 24, 202512:02 PM IST

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शेजारी शेजारी बसले, एकाच गाडीतून प्रवास

युतीच्या घोषणेआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा गाडीतून एकत्र प्रवास

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी पोहोचले

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर मोठी गर्दी

Dec 24, 202511:36 AM IST

Live Updates: उद्धव ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं

घराबाहेर कंदील, फुलांच्या माळांची सजावट, दीपोत्सवसारखी सजावट करण्यात आली

उद्धव ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं

 

advertisement
Dec 24, 202511:34 AM IST

Live Updates: उद्धव ठाकरे शिवाजीपार्कमध्ये पोहोचले

उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल

शिवाजीपार्क इथे पोहोचले, थोड्याच वेळा घोषणा होणार

Dec 24, 202511:33 AM IST

ठाकरे बंधूंचा राजकीय प्रवास

 

1989
राज ठाकरे यांचा राजकारणात प्रवेश

1995
शिवसेना सत्तेत, राज ठाकरे प्रमुख भूमिकेत

1997

राज आणि उद्धव ठाकरे वादाची सुरुवात

2002
उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष
राज ठाकरेंकडून घोषणा

2004
राज यांची उद्धव ठाकरेंवर उघड टीका

2005
राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर

2006
राज ठाकरेंकडून मनसेची स्थापना

2009
मनसेचे 13 आमदार निवडून आले

2012
मनपा निवडणुकीत राज ठाकरेंची बाळासाहेबांना युतीसाठी साद
पण काहीच घडलं नाही

2012
उद्धव ठाकरेंवर अँजिओग्राफी
दौरा सोडून राज ठाकरे लीलावती रुग्णालयात
स्वतःच्या कारमधून उद्धव यांना मातोश्रीवर सोडलं
2012 मध्ये युतीच्या चर्चांना पुन्हा सुरुवात

2012
बाळासाहेब ठाकरे यांचं निधन
युतीच्या चर्चा,मात्र प्रत्यक्षात उतरल्या नाहीत

2014
लोकसभेसाठी राज ठाकरेंचा मोदींना पाठिंबा
राज यांचं ‘तेलकट वडे आणि चिकन सूप’ वक्तव्य चर्चेत
पुन्हा राज आणि उद्धव ठाकरेंमधील दुरावा वाढला

2014
विधानसभेवेळी युतीची चर्चा, पण अडथळा

2017
मनपा निवडणुकीसाठी युतीची चर्चा अयशस्वी

2019
मुलगा अमितच्या विवाहाचं निमंत्रण घेऊन राज ठाकरे मातोश्रीवर

2019
लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात प्रचार
शिवसेनेकडून जहरी टीका

2019
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान
शपथविधीला राज ठाकरे उपस्थित
निवडणुकीत मनसेने आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नाही

2022
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत फूट
राज आणि शिंदेंमधील जवळीक वाढली
राज यांची उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर टीका

2024
लोकसभा निवडणुकीत राज यांचा महायुतीला पाठिंबा
श्रीकांत शिंदे आणि नारायण राणेंचा प्रचार
राज ठाकरेंची मोदींच्या सभेला उपस्थिती

2024
विधानसभा निवडणुकीत पुन्हा दुरावा
उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला

2025
मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र
6 जुलैला वरळी डोममध्ये ऐतिहासिक मनोमिलन

2025
20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र

 

Dec 24, 202511:26 AM IST

महापालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या जागांचा तिढा सुटला…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील शुभदिप निवासस्थाना हून मुंबईच्या दिशेने रवाना…

काल मध्यरात्री झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना..

महापालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या जागांचा तिढा सुटला…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत मंत्री उदय सामंत मुंबई च्या दिशेने रवाना..

Dec 24, 202511:17 AM IST

ठाणे पालिकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती

ठाणे पालिकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांच्या बैठकीत हा फॉर्म्युला निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या फॉर्म्युल्यानुसार ठाणे पालिकेत शिवसेना 81, भाजप 45 तर उरलेल्या पाच जागा मित्र पक्षांना सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे. ठाणे पालिकेत भाजपनं 55 जागांची मागणी केली होती. मात्र शिवसेनेनं भाजपला 45 जागा सोडण्यावर सहमती झाली. ठाण्यातील महायुतीची घोषणा परवा होणार असल्याची माहिती आहे.

Dec 24, 20259:59 AM IST

संजय राऊतांना धमकी देणा-याचा भाजपात प्रवेश

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मयूर शिंदेचा भाजपात प्रवेश

मयूर शिंदे पिल्ले गॅंगचा यांचा सदस्य म्हणून ओळखला जात होता

बांधकाम व्यवसायिक वैभव कोकाटे यांच्यावरती 2011 मध्ये गोळीबार केल्याचा आरोप

पोलिस अधिकारी यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी 2016 मध्ये अटक झाली होती..

2000 साली गुलाम अली हत्या प्रकरणात मुंबई पोलीस संघटना अटक केली होती..

Dec 24, 20258:57 AM IST

Live Updates: मुंबईत आमची 200 जागांची तयारी- प्रकाश आंबेडकर

मनसेला विरोध करत काँग्रेसनं ठाकरेंसोबत युती करण्याला विरोध केलाय…वंचित बहुजन आघाडीसारख्या समविचारी पक्षांसोबत युती करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांचं काँग्रेसशी बिनसलंय का असा प्रश्न पडत आहे. काँग्रेसने आपला जुना खेळ पुन्हा सुरू केल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं. लोकांमध्ये जे बोलतात, त्याविरुद्ध ते वागतात असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. मुंबईत आमची 200 जागांची तयारी असल्याचंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

Dec 24, 20258:50 AM IST

Raj-Uddhav alliance Live Update: ठाकरे बंधूंच्या युतीवरुन अमित साटम यांची जोरदार टीका

मामूंची टोळी एकत्र आली तरी महापालिकेमध्ये काहीही परिणाम होणार नसल्याचं अमित साटम यांनी म्हटलंय…ठाकरे बंधूंच्या युतीवरुन त्यांनी जोरदार टीका केलीय.

Dec 24, 20258:49 AM IST

Live Updates: ठाकरे बंधू कुठे-कुठे एकत्र लढणार, संजय राऊत यांनी थेट सांगितली नावं

ठाकरे बंधू मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक,नवी मुंबई, कल्याण डोंबिवली आणि मीरा भाईंदरमध्ये एकत्र लढणार आहेत.. तर जागावाटपासंदर्भात चर्चा पूर्ण झाल्याची माहिती संजय राऊतांनी दिलीय.

Dec 24, 20258:48 AM IST

महानगरपालिका निवडणूक: राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काँग्रेसला 50 जागांसाठीचा प्रस्ताव

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काँग्रेसला 50 जागांसाठीचा प्रस्ताव…
मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र लढलो तर फायदा होईल अशी नेत्यांची भुमिका…
काँग्रेस नेते आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर आज राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळांनी काँग्रेसला दिला प्रसताव…
या प्रस्तावाच्या संदर्भात उद्या परत कांग्रेस नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते यांची भेट होणार…
काँग्रेसची एकीकडे वंचित सोबत बोलणी सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचाही प्रस्ताव आल्याने काँग्रेसला आता भूमिका घ्यावी लागणार

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Live Updates: मुंबईकडे वाकड्या नजरेनं पाहिल त्याचा राजकारणात खात्मा, उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
advertisement
BMC Election: मतदानापूर्वीच काँग्रेसला २८ जागांवर धक्का! मुंबई महापालिका निवडणुकीत कोंडी, नेमकं कारण काय?
मतदानापूर्वीच काँग्रेसला २८ जागांवर धक्का! बीएमसी निवडणुकीत कोंडी, नेमकं कारण का
  • मतदानापूर्वीच काँग्रेसला २८ जागांवर धक्का! बीएमसी निवडणुकीत कोंडी, नेमकं कारण का

  • मतदानापूर्वीच काँग्रेसला २८ जागांवर धक्का! बीएमसी निवडणुकीत कोंडी, नेमकं कारण का

  • मतदानापूर्वीच काँग्रेसला २८ जागांवर धक्का! बीएमसी निवडणुकीत कोंडी, नेमकं कारण का

View All
advertisement