Vijay Salvi : बाळासाहेबांचे निष्ठावंत आणि माजी आमदार विजय साळवी यांचं निधन
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार विजय साळवी यांचं वृद्धापकाळाने निधन झालं.
शिवाजी गोरे, प्रतिनिधी
रत्नागिरी : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार विजय साळवी यांचं निधन झालं. बाळासाहेबांचे निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिक असणाऱ्या विजय साळवी यांनी वयाच्या 95 वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांची अंत्ययात्रा थीबा पॅलेस इथल्या निवासस्थानाहून सायंकाळी ४ वाजता निघणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेच्या वाटचालीत विजय उर्फ आप्पा साळवी यांचं मोठं योगदान होतं. ते आधी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख होते. त्यानंतर १९९० मध्ये रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. पुढे १९९५ मध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघातून विजय साळवी हे आमदार होते. १९९५ ते १९९९ या काळात ते आमदार राहिले.
advertisement
विजय साळवी यांना वयोमानानुसार आऱोग्याच्या तक्रारी होत्या. सोमवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना सकाळी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. उपचारावेळी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2024 9:59 AM IST


