advertisement

क्षणभराचा राग अन् सगळं कुटुंब उद्ध्वस्त, 2 मुलं पोरकी, सोलापुरात विवाहितेचा भयावह अंत

Last Updated:

Solapur News: सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील राजुरी गावातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इथं एका विवाहितेनं विहिरीत उडी मारून आपलं जीवन संपवलं आहे.

News18
News18
वीरेंद्रसिंह उत्पात, प्रतिनिधी पंढरपूर: सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील राजुरी गावातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इथं एका विवाहितेनं विहिरीत उडी मारून आपलं जीवन संपवलं आहे. प्राजक्ता साखरे असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. या घटनेमुळे राजुरी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकं काय घडलं?

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राजक्ता साखरे यांचे सासरच्या मंडळींशी गेल्या काही दिवसांपासून किरकोळ वाद सुरू होता. हा कौटुंबीक वाद इतका विकोपाला गेला की, यातून रागाच्या भरात प्राजक्ता यांनी टोकाचं पाऊल उचललं. प्राजक्ता यांनी घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी धाव घेत प्राजक्ता यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
advertisement

दोन लहान मुलं झाली पोरकी

प्राजक्ता साखरे यांना दोन लहान मुलं आहेत. कौटुंबिक वादामुळे या लहानग्यांनी आपल्या आईला गमावलं आहे. क्षणभराच्या रागातून उचललेल्या टोकाच्या पावलामुळं संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झालं आहे. प्राजक्ताने अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर प्राजक्ता यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी तत्काळ करमाळा पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या प्रकरणी त्यांनी सासरच्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. करमाळा पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, ते याप्रकरणी अधिकचा तपास करत आहेत. कौटुंबीक वादाचं नेमकं कारण काय होतं? सासरच्या मंडळींकडून काय त्रास होता ? या सर्व बाजूंनी पोलीस तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
क्षणभराचा राग अन् सगळं कुटुंब उद्ध्वस्त, 2 मुलं पोरकी, सोलापुरात विवाहितेचा भयावह अंत
Next Article
advertisement
Sanjay Raut On Cancer: "पाणी पिणंही कठीण झालं होतं..."; संजय राऊतांचा मृत्यूशी झुंज देणारा तो थरार, पहिल्यांदाच केला खुलासा!
"पाणी पिणंही कठीण झालं होतं..."; संजय राऊतांचा मृत्यूशी झुंज देणारा तो थरार, पहि
  • ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मागील वर्षी गंभीर आजाराने ग्रासले होते.

  • संजय राऊत यांनी आपल्या आजाराबाबत सविस्तर भाष्य केले आहे.

  • दिवाळीच्या काही दिवस आधीच आपल्याला कॅन्सर झाल्याचे राऊत यांनी सांगितले

View All
advertisement