बाळासाहेबांच्या पार्थिवाचे हाल का करताय? शरद पवारांना खोलीत जाऊ दिलं नाही; रामदास कदमांनी सगळचं बाहेर काढलं
- Published by:Prachi Amale
Last Updated:
बाळासाहेबांच्या बॉडीचा दोन दिवस छळ केला. मी खोटं बोलतोय तर माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट होऊन जाऊ देत, असं आव्हान देखील रामदास कदम यांनी दिलं.
मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवला होता. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचेही ठसे घेण्यात आले होते. हे ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते? असा शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी आरोप केला आहे. रामदास कदम यांच्या वक्तव्यानंतर मोठी खळबळ उडाली असून ठाकरे गटाने जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर रामदास कदम पुन्हा माध्यमांसमोर येत मी जे आरोप केले, त्यावर ठाम आहे असं म्हणत थेट उद्धव ठाकरेंना पुन्हा खुले आव्हान दिले आहे
रामदार कदम म्हणाले , मी काल जे बोललो त्यावर ठाम आहे. बाळासाहेब ठाकरे माझे दैवत आहेत. दोन दिवस बाळासाहेब साहेब ठाकरे यांच्या बॉडीचा छळ उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मी हे जबाबदारीने पुन्हा बोलत आहे. उद्धव ठाकरेंनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवून खरं सांगावं. मी त्यांना बोललो बाळासाहेब यांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा हे दैवत आहे . तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले मी हाताचे ठसे घेऊन ठेवले आहेत. हे माझं आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं सांभाषण आहे. मी काल ठरवून नाही बोललो ओघाओघाने बोललो , मी ज्या वेळी बोलले तेंव्हा मातोश्रीला हदरा बसेल.
advertisement
शरद पवारांना खोलीबाहेरचं अडवलं : रामदास कदम
रामदास कदम यांनी या वेळी शरद पवारांचा देखील उल्लेख केला आहे. रामदास कदम म्हणाले, मी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत निष्टेने दिवस काढले आहेत. मीडियाने जावं डॉक्टरांना विचारावं, मी जे बोललो त्यावर मी ठाम आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर दोन दिवस कोणालाही वरती पाठवले नाही. शरद पवार यांना सुद्धा त्यांच्या खोलीमध्ये जाऊ दिलं नव्हतं. बाळासाहेबांच्या बॉडीला त्रास देताय ,मृतदेहाचे हाल का करता असे विचारलं होतं.
advertisement
बाळासाहेबांच्या बॉडीचा दोन दिवस छळ : रामदास कदम
उद्धव ठाकरे कपटी आहेत. मी जे बोललो त्यावर उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे. अंबादास दानवे काय मला शिकवणार शिवसेना, मी त्यांना निवडून आणलं. बाळासाहेबांच्या बॉडीचा दोन दिवस छळ केला. मी खोटं बोलतोय तर माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट होऊन जाऊ देत, असं आव्हान देखील रामदास कदम यांनी दिलं. बाळासाहेब ठाकरेंच्या हातांच्या ठसाचा उपयोग कशासाठी झाला, याबाबत उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं, असंही रामदास कदम म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 03, 2025 3:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बाळासाहेबांच्या पार्थिवाचे हाल का करताय? शरद पवारांना खोलीत जाऊ दिलं नाही; रामदास कदमांनी सगळचं बाहेर काढलं